संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन पुढील १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे (IPL 2020) आयोजन २९ मार्चला होणार होते. पंरतु सध्या कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
अशामध्ये सर्व खेळाडू लॉकडाऊनचे (Lockdown) पालन करताना दिसत आहेत. त्यामुळे ते आपापल्या परिवारासोबत घरांमध्ये वेळ घालवत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मंगळवारी (३१ मार्च) आपल्या फार्म हाऊसवर घोडेस्वारी (Horse Riding) करताना दिसला. या दरम्यानचा व्हिडिओ जडेजाने शेअर केला आहे.
जडेजाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “घोडेस्वारी करणे मला सर्वात जास्त आवडते.”
My all time favourite 🐎 pic.twitter.com/DjQWAP6Cze
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 31, 2020
जडेजाने यापूर्वी जिममध्ये रनिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा त्याने ट्वीट केले होते की, रनिंग माझी ताकद आहे. हे माझ्या शरीराला नेहमी फीट ठेवते. त्याचबरोबर त्याने आणखी एक ट्वीट केला होता. त्यामध्ये त्याने लॉकडाऊनचे पालन करणे आणि घरामध्ये रहाण्याचे आवाहन केले होते.
कोरोना व्हायरसने (Corona Virus) संपूर्ण भारतात थैमान घातले आहे. मंगळवारी या व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या २७२ ने वाढली आहे. पहिल्यांदा इतक्या जास्त संख्येने लोकांना लागण झाली आहे.
देशात सध्या १९६५ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये जवळपास १९०० लोक पॉझिटिव्ह आहेत. तर १५१ लोक या व्हायरसमधून ठीक झाले आहेत. तसेच ५० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५८३ सामने खेळलेल्या धोनीच्या नावावर आहे फक्त त्या खेळाडूची विकेट
-७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त झिरो
-धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
-गद्दार म्हणणाऱ्यांना युवराजची सणसणीत चपराक
-डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन