जगभरात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनने थैमान घातले आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटप्रेमीं देखील संभ्रमावस्थेत आहेत. अशात बीसीसीआयने (bcci) आगामी काळातील एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जाणारी १६ वर्षाखालील विजय मर्चेंट (vijay merchant trophy) स्पर्धा स्थगित केली गेली आहे. एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी गुरुवारी (३० डिसेंबर) विजय मर्चेंट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना इ मेल पाठवून सांगितले की, देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात चांगली राहिली असून, आतापर्यंत ७४८ सामने खेळले गेले आहेत. परंतु कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक वाढू लागल्यामुळे जूनियर क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली आहे. मोठा निर्णय घेत विजय मर्चेंट ट्रॉफी २०२२ रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
जय शहा म्हणाले, आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत. जर सुरक्षा बाळगली गेली नाही, तर भविष्यात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे तज्ञ आणि मेडिकल टिमसोबत दीर्घ चर्चा कल्यानंतर १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफी २०२२ स्थगित केली गेली आहे. याचे प्रमुख कारण आहे की, सहभाग घेणार्या खेळाडूंचे लसीकरण झालेले नाही आणि त्यांना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. आम्ही आपल्या गुणवंत आणि युवा क्रिकेटपटूंच्या आरोग्याला धोक्यात टाकू शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे.’
दरम्यान, बीसीसीआयच्या आयोजनात खेळवली जाणारी १६ वर्षाखालील विजय मर्चेंट क्रिकेट स्पर्धा ९ जानेवारीपासून सुरु होणार होती. परंतु आता बीसीसीआयने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा डेहराडूनमध्ये आयोजित केली गेली होती. त्यापूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्याठिकाणी पोहोचण्याच्या सुचना केल्या गेल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
Bye Bye 2021 | ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
असा एक खेळाडू ज्याचे पदार्पण १७ व्या वर्षी झाले, पण कारकिर्द राहिली केवळ ४ वर्षांची
प्रवीण तांबेच्या ‘प्रेरणादायी’ आयुष्यावर बनतोय चित्रपट; ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारतोय भूमिका
व्हिडिओ पाहा –