कधी कोणते क्रिकेट स्टेडियम दोन देशांमध्ये पसरलेले आहे, असे ऐकून अनेकांना या गोष्टीवर विश्वासही बसणार नाही. परंतु वास्तवात एक फुटबॉल स्टेडियम असे आहे, ज्याचे मैदान तर वेल्समध्ये आहे. पण त्याची पार्किंग इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधील फुटबॉल क्लब चेस्टर एफसीचे घरचे स्टेडियम, डेवा स्टेडियम अशाप्रकारचे आहे. यामुळे बऱ्याचदा संघाला असुविधेचा सामना करावा लागतो. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अशीच वेळ ओढावली आहे.
कधी इंग्लंडच्या फुटबॉल संघांमधील अव्वल संघांमध्ये राहिलेला हा संघ आता सहाव्या स्तरावर खेळतो आहे. या संघाच्या स्टेडियमची विशेषता ही फक्त त्याची जागा आहे. परंतु बऱ्याचदा स्टेडियमच्या जागेमुळेच संघाला असुविधांना सामोरे जावे लागले आहे. चेस्टर एफसी क्लबचे अधिकृत इतिहासकार चेस सुमनेर म्हणत असायचे की, या स्टेडिमयची जागा फक्त नाव-प्रसिद्धीसाठी गौण आहे. परंतु यामुळे कधी-कधी असुविधा होत असायची.
व्हिडिओ पाहा-
आता अशाच काहीशा असुविधेमुळे चेस्टर एफसी संघाला अचानक त्यांचा सामना रद्द करावा लागला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, चेस्टर एफसीवर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी वेल्सच्या कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे.
त्याचे झाले असे की, चेस्टर एफसीने नवीन वर्षादरम्यान घरच्या मैदानावर २ सामने खेळले होते. यावेळी २ हजारपेक्षाही जास्त प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी आले होते. इंग्लंडमधील कोरोना नियमांनुसार प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी येण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु यामुळे वेल्समधील नियमांचे उल्लंघन झाले आहे. कारण वेल्समधील कोरोना नियमांनुसार फक्त ५० लोक आऊटडोअर कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
मात्र चेस्टर एफसीला वाटले नव्हते की, हा नियम त्यांनाही लागू होईल. त्याचमुळे त्यांनी २००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली होती.
हेही वाचा-आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान
याबद्दल बोलताना चेस्टर एफसीचे वॉलिंटियर अध्यक्ष एँड्र्यू मॉरिस म्हणाले की, आमचा इंग्लिश क्लब आहे, ज्याचे स्टेडियम इंग्लंड आणि वेल्स दोन्ही भागात परसलेले आहे. आम्ही इंग्लिश फुटबॉल असोसिएशनचा भाग आहोत. ज्या जमिनीवर हे स्टेडियम बनवले गेले आहे, ती जागा इंग्लिश काउंसिलअंतर्गत येते. त्यामुळे आम्ही इंग्लंडच्या सरकार आणि त्यांच्या पोलिसांअंतर्गत येतो. परंतु वेल्सच्या अधिकाऱ्यांना यामुळे कसलाही फरक पडत नाही.
तर दुसरीकडे सरकारच्या एका प्रतिनिधीने म्हटले आहे की, चेस्टर फुटबॉल क्लबचे स्टेडियम वेल्समध्ये आहे. त्यामुळे येथे वेल्सचे नियम लागू होतात. याच पेचामुळे चेस्टर एफसीला त्यांचे सामना रद्द करावा लागला आहे. ते सध्या याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बदल होणारच! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून होणार भारतीय क्रिकेटची ‘नवी सुरुवात’
आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान
ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याच्या घरी होणार चिमुकल्या पावलांचे आगमन; पत्नीचा फोटो केला शेअर
हेही पाहा-