रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी (25 एप्रिल) या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली गेली. मात्र, आता या अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अलिकडे चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका (BGT) खेळली गेली. या मालिकेदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघ निश्चित झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यावर्षी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना होण्याचे निश्चित झाले.
या अंतिम सामन्यासाठी आता ड्युक चेंडूचा वापर केला जाणार आहे. भारत मायदेशात एसजी चेंडूने खेळत असतो. तर, ऑस्ट्रेलिया आपल्या देशात कुकाबुरा चेंडूचा वापर करतो. ड्युक चेंडू हा अधिक स्विंग होत असल्याने, भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. यजमान देशाला चेंडूची निवड करण्याचा अधिकार असल्याने इंग्लंडने या चेंडूची निवड केली आहे. आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा केली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल येथे पार पडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील हा सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे. (
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
(Duke Ball Use For ICC WTC Final 2023 Team India Tensed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीकडून मिळालेली संधी इशांत शर्माने साधली! नेट्समध्ये सराव जोरात सुरू
धक्कादायक! दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूचे महिलेशी गैरवर्तन, फ्रॅंचाईजी ‘ऍक्शन मोड’वर