बुधवारपासून (दि. 28 जून) दुलीप ट्रॉफी स्पर्धेने भारतात देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली. बंगळुरूच्या मैदानांवर दुलीप ट्रॉफीचे दोन उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. पहिला उपांत्यपूर्व सामना अलुरच्या मैदानावर, तर दुसरा सामना एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यात नॉर्थ झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन आमने-सामने आहेत. सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या नॉर्थ झोन संघाने दुसऱ्या दिवशी 8 बाद 540 धावांवर डाव घोषित केला. यामध्ये आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज हर्षित राणा याने वादळी फलंदाजी करत खास कारनामा केला.
हर्षितचे पहिले प्रथम श्रेणी शतक
डावाच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॉर्थ झोन (North Zone) संघाने 6 बाद 306 धावसंख्या उभारली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संघाने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 540 धावा करत डाव घोषित केला. या धावा करण्यात तीन फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. त्यात ध्रुव शोरे (135), निशांत सिंधू (150) आणि हर्षित राणा (नाबाद 122) यांचा समावेश होता.
दुसऱ्या दिवशी निशांत सिंधू याने 76 धावांची खेळी पुढे नेली आणि शानदार शतक झळकावले. त्याने पुल्कित नारंग याच्यासोबत शतकी भागीदारी केली. त्यानंतर, नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हर्षित राणा (Harshit Rana) याच्यासोबत मिळून 104 धावांची भागीदारी रचली. निशांतने 150 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. असे असले, तरीही दुसऱ्या बाजूला असलेल्या हर्षित राणाने पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या हर्षितने 75 चेंडूत हे वादळी शतक ठोकले. डाव घोषित झाला तेव्हा, हर्षितने 86 चेंडूत 122 धावांवर नाबाद राहिला. नॉर्थ झोनच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्थ ईस्ट झोन संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 65 धावसंख्या उभारली. नॉर्थ ईस्ट झोन संघ पहिल्या डावात अजूनही 475 धावा दूर आहे.
Harshit Rana, who is 2nd front line bowler for KKR in IPL 2023 has scored maiden first class hundred (122* from 86 balls) in duleep trophy quarterfinals for North zone ????????????????????????
North zone 540/8 d against Northeast zone ????????????#DuleepTrophy #harshitrana pic.twitter.com/hRZHOxdrQu
— UMPIRE view (@Umpire_View) June 29, 2023
हर्षित राणाची आयपीएल 2023मधील कामगिरी
केकेआर (KKR) संघाचा गोलंदाज हर्षित राणा याला आयपीएल 2023 हंगामात 6 सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 20.40च्या सरासरीने 5 विकेट्स नावावर केल्या होत्या. यामधील 33 धावा खर्चून 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. (duleep trophy 2023 quarter finals round up day 2 cricketer harshit rana hit century)
महत्वाच्या बातम्या-
‘एमपीएल आणि वनडे विश्वचषकामुळे पुण्यात क्रिकेट संस्कृती वाढणार’, शरद पवार यांचे प्रतिपादन
‘मला नेहमीच त्याची चिंता वाटते, तो लवकर जखमी…’, भारताच्या स्टार खेळाडूविषयी कपिल पाजींचे लक्षवेधी भाष्य