---Advertisement---

Dulip trophy: दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये पोहोचले ‘हे’ दोन संघ, पहा कधी होणार सामना

On: रविवार, सप्टेंबर 7, 2025 7:53 PM
---Advertisement---

Dulip trophy 2025: दुलीप ट्रॉफी 2025 च्या फाइनलमध्ये दोन संघानी आपली जागा निश्चित केली आहे. सेमीफायनलमध्ये वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन एकमेकांसमोर उतरले, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नॉर्थ झोन आणि साउथ झोन यांचा सामना झाला. आता सेमीफायनल नंतर दुलीप ट्रॉफी 2025 चे दोन फाइनलिस्ट ठरले असून, हे दोन दमदार संघ फाइनलमध्ये भिडणार आहेत.

दुलीप ट्रॉफी 2025 च्या फाइनलमध्ये साउथ झोन आणि सेंट्रल झोनने आपली जागा मिळवली आहे. फाइनल सामना बंगळुरू येथील सेंट्रल ऑफ एक्सीलेंसमध्ये होईल. हा सामना 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होईल, तर टॉस सामना सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी होईल.

सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांच्या फलंदाजांनी कमाल कामगिरी केली. साउथ झोनकडून पहिल्या डावात नारायण जगदीशनने 352 चेंडूत जबरदस्त 197 धावा केल्या. त्याशिवाय देवदत्त पडिक्कलनेही 57 धावांचा मोलाचा हातभार लावला. तर सेंट्रल जोनकडे पाहिले तर दानिश मलेवरने 96 धावांचे योगदान दिले, तर रजत पाटीदारने 77 धावांचा डाव खेळला. तसेच उपेंद्र यादवने 87 आणि हर्ष दुबेने 75 धावा केल्या. दोन्ही संघांचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे फाइनल सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---