पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहीद आफ्रिदीनं (Shahid Afridi) आपल्या कारकीर्दीत क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी या दिग्गज खेळाडूचा एक व्हिडिओ त्याच्या क्रिकेटमधील साथीदार खेळाडूनं सोशल मीडियावर टाकला आहे. तो जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) नुकताच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024च्या स्पर्धेत खेळला. या स्पर्धेत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला होता. परंतू त्यांना फायनलमध्ये भारताचं मोठं आव्हान होतं. फायनल सामन्यात भारतानं त्यांना लोळवलं. या स्पर्धेत पाकिस्तान संघाचा कर्णधार युनूस खान (Younis Khan) होता.
युनूस खानचा (Younis Khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो एक खेळ खेळत होता. ज्यामध्ये खेळाडूंना ओळखावं लागत होतं. त्या शो दरम्यान होस्ट त्याला विचारतो की, जेव्हा पाकिस्तानचा स्कोर 5 बाद 51 होता, तेव्हा तो आला आणि स्कोर 6 विकेट्सवर 51 असा झाला. त्यावर युनूस खान म्हणतो तो खेळाडू शाहीद आफ्रिदी होता. यावर सर्वजण खूप हसतात.
Tabish Hashmi:
Jab Pak ka score 51-5 hota ye ate toh 51-6 hojata 😂Younas khan : Shahid Afridi toh nahi 🤣#PakistanCricket #ShahidAfridi pic.twitter.com/bzKxW59Quv
— ЅᏦᎽ (@13hamdard) July 24, 2024
शाहीद आफ्रिदीनं (Shahid Afridi) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 524 सामने खेळले. त्यामध्ये तो 44 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यामुळे तो कित्येक वेळा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. आफ्रिदीनं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 398 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 8,064 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 23.57 राहिली. 398 सामन्यांमध्ये त्यानं 39 अर्धशतकांसह 6 शतक झळकावले आहेत. तर गोलंदाजीमार्फत त्यानं 395 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
आफ्रिदीनं 27 कसोटी आणि 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1,716 धावा आणि 48 विकेट्स आहेत. तर 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 150च्या स्ट्राईक रेटनं 1,416 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 17.92 राहिली आहे. तर गोलंदाजीमार्फत त्यानं 99 सामन्यात 98 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान
ब्रायन लाराचा महान रेकाॅर्ड मोडीत काढणार इग्लंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू