---Advertisement---

टीम वर्क! हातून चेंडू निसटल्याने ब्रावोने पायाने मारली किक, मग काय सहकारी ऍलेनने टिपला झेल

On: मंगळवार, जुलै 13, 2021 1:41 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सोमवारी (१२ जुलै) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने ६ गडी राखून विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे. तसेच या सामन्यात ड्वेन ब्रावो आणि फेबियन ऍलेन या दोघांनी मिळून एक अप्रतिम झेल टिपला आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ड्वेन ब्रावो आणि फेबियन ऍलेनचा अप्रतिम झेल
तर झाले असे की, वेस्ट इंडिज संघाकडून हेडन वॉल्श १२ वे षटक टाकण्यासाठी आला होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने ॲलेक्स केरीला बाद करत माघारी धाडले. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर फिंचने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू लांब न जाता उंच गेला होता. लाँग ऑन मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेले क्षेत्ररक्षक हा झेल टिपण्यासाठी मागे धावले. दोघांनीही आपले लक्ष चेंडूवर केंद्रित केले होते.

ब्रावोने हा झेल टिपला. परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटला. तो चेंडू जमिनीला स्पर्श होईल इतक्यात त्याने चंडूला लाथ मारली. मग पुढे असलेल्या फेबियन ऍलेनने लगेचच डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिज संघाने मिळवला ६ गडी राखून विजय
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाकडून मोईसेस हेनरिक्सने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार आरोन फिंचने ३० धावांची खेळी केली. तसेच यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यु वेडने २३ धावांची खेळी केली. २० षटकांच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलिया संघाला ६ बाद १४१ धावा करण्यात यश आले.(Dwayne Bravo dropped the ball and then Fabian Allen took stunning catch watch video)

ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघातील सलामी फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यानंतर ख्रिस गेलने ताबडतोड ६७ धावांची खेळी आणि निकोलस पुरणच्या ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने ३१ चेंडू आणि ६ गडी शिल्लक असताना हा सामना आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या-

आजच्या दिवशी ४७ वर्षांपूर्वी भारताने खेळला होता पहिला वनडे, ‘असा’ लागला होता निकाल

‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’

लाॅर्ड्सवर गांगुली त्या खेळाडूला म्हणाला, ‘तू पण टी-शर्ट काढ’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---