भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने कोरोनाच्या या काळात खूप काही शिकायला मिळाले असल्याचे सांगितले आहे. तो म्हणला, की जेव्हा अडचणी येतात, तेव्हा ते बरेच काही शिकण्याच्या संधी घेऊन येतात.
मी माझ्या आयुष्यात कधीही दुसऱ्याचं दु:ख इतक्या जवळून समजू शकलो नव्हतो. इतर कोणतेही दु:ख मला इतके जवळून समजले नाही. येणाऱ्या काळात मी जमीन घेईल, आणि तेथे जे काही धान्य पिकेल ते फक्त गरीब कुटुंबात वाटून देईल, असेही हरभजन (Harbhajan Singh) पुढे म्हणाला.
ई- सलाम क्रिकेट २०२० मध्ये हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला, “देवाने आम्हाला त्यालायक बनवलं आहे. जेणेकरून आम्ही काही लोकांची मदत करू शकतो. मग ते खायला देणं असो किंवा घरी परत पाठवण्याच्या स्वरूपात असो. जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीत त्यांच्यापाशी उभे राहून हसून बोलत असाल, तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवू शकाल.”
“लॉकडाऊन दरम्यान माझ्या जवळच्या मित्रांनी अनेक घरांमध्ये आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. बर्याच लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवलं आहे. मी प्रयत्न करेल, की येत्या काळात मी एक जमीन घेईन आणि तेथे जे काही धान्य पिकेल मी ते फक्त आणि फक्त त्या कुटुंबाला देईल, ज्यांना खाण्यासाठी धान्य मिळत नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
“देवाने आम्हाला बरंच काही दिलं आहे. म्हणून आता समाजाला देणं आपल कर्तव्य आहे. कोरोनाने मला माणुसकी शिकवली. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. पण कोरोनाला (Corona Virus) आता येथून निघून जावं लागेल,” असे कोरोनाबद्दल बोालताना हरभजन म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुम्ही त्याला वाईट म्हणून तुमच्यातील जळकी वृत्ती दाखवून दिली
-“खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर चेंडूला लाळ लावू द्या”
-आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानला विश्वचषकात ७व्यांदा पाजले होते पाणी