भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. आयएस बिंद्रा स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी आल्यानंतर सलामीवीर मिचेल मार्श अवघ्या चार धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी याने डावातील पहिल्याच षटकात भारताला हे यश मिळवून दिले.
ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करायला मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर आली होती. मार्शने चार चेंडूत एक चौकार मारून चार धावा केल्या आणि विकेट गमावली. मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने टाकलेल्या पहिल्या षटकातील चौथा चेंडू मार्शच्या बॅटला लागून स्लिप्समध्ये शुबमन गिल (Shubman Gill) याच्या हातात गेला. गिलने जराही चूक न करता हा झेल पकडला आणि भारताला पहिली विकेट स्वस्तात मिळाली. (Early success for Team India! a wicket for Mohammad Shami as Shubman Gill takes the catch.)
Early success for #TeamIndia!
A wicket for @MdShami11 as Shubman Gill takes the catch.
Australia lose Mitchell Marsh.
Live – https://t.co/F3rj8GI20u… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/cNcwJeQiXN
— BCCI (@BCCI) September 22, 2023
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक
पाहावं ते नवलंच! Umpireच्या अंगात संचारला John Cena, त्याच्याच स्टाईलमध्ये फेटाळली गोलंदाजाची अपील- Video