---Advertisement---

IPL 2025: रिषभ पंत नाही ‘या’ खेळाडूनं केलं फ्रेंचायझीचं नुकसान! घेतले 10.75 कोटी, खेळला फक्त 2 सामने!

On: मंगळवार, जून 3, 2025 8:08 PM
---Advertisement---

यावर्षी आयपीएलमध्ये (IPL 2025) रिषभ पंत (Rishbh Pant) म्हणावा तसा खेळला नाही. लखनऊने त्याला मेगा लिलावात 27 करोड रुपयांना खरेदी केले होते. एवढा महाग खेळाडू ठरल्यानंतर त्याच्याकडून खूप आशा होत्या की तो संघाला पहिली आयपीएल ट्रॉफी देऊ शकेल. पंतला कर्णधार बनवण्यात आले होते आणि त्याने पूर्ण 14 सामने खेळले, पण जशी फ्रेंचाईजीला आशा होती त्याप्रमाणे तो खेळू शकला नाही. आता जेव्हा सर्वात महागड्या खेळाडू बद्दल चर्चा होत आहे, तर फक्त त्याची किंमत नाही तर त्याचे प्रदर्शन सुद्धा बघितले जाते.

या प्रकारे बघितल्यास दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natrajan) सुद्धा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. संघाने त्याला 10.75 करोड रुपयांना खरेदी केली होते, पण त्याने पूर्ण हंगामात फक्त दोन सामने खेळले.

नटराजने दोन सामने खेळले आणि त्यात एकही विकेट घेतली नाही. म्हणजेच संघाने त्याला एका सामन्यासाठी 5.37 करोड रुपये दिले. हे पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे की, एवढ्या महाग किमतीला त्याला घेऊनही त्याला पूर्ण स्पर्धेत का खेळवण्यात आले नाही.

असं मानलं जात आहे की, नटराजन दुखापती होता पण यावर संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तो पूर्ण हंगामात संघासोबत सराव करताना दिसला. एवढ्या महागड्या खेळाडूला तर प्रत्येक सामन्यात खेळवले पाहिजे, पण यावेळेस असे झाले नाही.

टी नटराजनला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पण त्याने केवळ एका सामन्यात गोलंदाजी केली, त्याने यादरम्यान तीन ओव्हर म्हणजेच 18 चेंडू टाकले. त्याला 10. 75 करोड रुपये मिळाले पण नटराजने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्याने 14 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---