विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन दिवसापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. हा सामना १६ जून ते १९ जून दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण तब्बल ७ वर्षानंतर भारतीय महिला संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, ईसीबीने महिला कसोटी संघाची घोषणा केली आहे.
भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला होते. या दौऱ्यावर पुरुष क्रिकेट संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर महिला संघाला एकमात्र कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामीसह अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड महिला संघात भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी एमिली अरलोटला संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. तसेच नॅट सायव्हरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर हीदर नाईट इंग्लंड संघाची कर्णधार असेल. याबरोबरच अन्या श्रबसोल, सोफी इक्लेस्टोन, केट क्रॉस अशा काही अनुभवी खेळाडू देखील आहेत.
England Women have announced a 17-member squad for their Test against India, starting 16 June in Bristol. pic.twitter.com/JxirWFpSKJ
— ICC (@ICC) June 9, 2021
असा आहे एकमात्र कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा महिला संघ
हीदर नाइट (कर्णधार), नॅट सायव्हर (उपकर्णधार), एमिली अरलोट, टॅमी ब्यूमॉन्ट,कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रीया डेव्हिस, सोफिया डन्कले, सोफी इक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, ताश फारंट, सारा ग्लेन, अॅमी जोन्स, अन्या श्रबसोल, मॅडी व्हिलियर्स, फ्रॅन विल्सन,लॉरेन विनफिल्ड.
असे आहे सामन्यांचे वेळापत्रक
एकमात्र कसोटी सामना = १६ ते १९ जून,( काउंटी मैदान, ब्रिस्टल)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना = २७ जून (काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल)
दुसरा वनडे सामना = ३० जून, (कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉन्टन)
तिसरा वनडे सामना = ३ जुलै, (न्यू रोड, वॉरेस्टर)
टी-२० मालिका
पहिला टी -२० सामना = ९ जुलै, (नॉर्थहेम्प्टन)
दुसरा टी -२० सामना = ११ जुलै, (होव)
तिसरा टी -२० सामना = १५ जुलै,(चेल्म्सफोर्ड)
महत्त्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिसच्या शरिरावरील टॅट्यूमागील रहस्य माहित आहेत का? नसेल तर घ्या जाणून
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती