---Advertisement---

कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धरले ‘या’ देशाचे पाय; मदत मागताना म्हटले…

On: रविवार, जानेवारी 16, 2022 7:20 AM
ENGLAND-TEST-TEAM
---Advertisement---

इंग्लंडचा एकदिवसीय आणि टी२० संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड विश्वविजेता आहे, तर मागच्या वर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकात इंग्लंड उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. परंतु, कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडचे प्रदर्शन मागच्या मोठ्या काळापासून निराशाजनक राहिले आहे. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत देखील त्यांनी चाहत्यांची निराशा केली आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) काही मोठे निर्णय घेऊ शकतो. इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन (tom harrison) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंना ऑस्ट्रेयातील परिस्थिती वेळ घालवण्याची गरज आहे – टॉम हॅरिसन

इंग्लंडचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन सुधारण्यासाठी ईसीबीकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र लिहिले गेले आहे. या पत्रात इंग्लंडच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा शेफील्ड शील्डमध्ये खेळण्याची परवानगी मागितली गेली आहे. बीबीसीसोबत बोलताना टॉम हॅरिसन म्हणाले की, ” मी अधिकृतपणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिले आहे  आणि विचारले आहे की, ते आमच्या खेळाडूंना शेफील्ड शील्डमध्ये खेळण्याची परवानगी देतील का ?”

“आम्ही अधिक चांगले प्रदर्शन करू शकतो. आम्हाला सर्व कारणे पाहण्याची गरज आहे. हे खूप निराशाजनक आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू शकलेलो नाहीत, ही इंग्लंडच्या चाहत्यांसाठी शरमेची बाब आहे. हे स्पष्ट आहे की, लाल चेंडूच्या क्रिकेटला आपल्या देशात पुनर्रचित करण्यासाठी आम्ही काहीतरी करण्याची गरज आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे तयार करू शकू.” असे हॅरिसनने पुढे बोलताना सांगितले.

दरम्यान, इंग्लंड संघाच्या अलिकडच्या काळातील कसोटी प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. इंग्लंड संघाने खेळलेल्या मागच्या १३ कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. सध्या सुरू असेल्या ऍशेस मालिकेतही इंग्लंडला पराभव मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर ऍशेसचा चौथा सामना इंग्लंडने कसाबसा अनिर्णीत केला. उभय संघात सध्या पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे आणि यामध्ये देखील ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा

वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर

अजब गजब! दोन वेगवेगळ्या देशात स्टेडियम असल्यामुळे रद्द करावा लागला सामना, कारणंही आहे तसंच

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---