भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र भारतीय संघ पुन्हा पुढच्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने बोर्डाने (ईसीबी) पुढच्या वर्षी होणाऱ्या या मालिकेबाबत माहिती दिली.
तसेच ईसीबीने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड सोबत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका पुढीलवर्षी जून महिन्यात खेळवली जाणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात ३ टी-२० सामने आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.
पुढीलवर्षी या मालिकेची सुरुवात टी-२० सामन्यापासून होणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी-२० सामना १ जुलै ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर होणार आहे. दुसरा टी-२० सामना ३ जुलैला ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर होणार आहे. तर एजेज बाउल मैदानावर तिसरा टी-२० सामना ६ जुलैला खेळविण्यात येणार आहे.
त्यानंतर ९ जुलैपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना एजबॅस्टनच्या मैदानावर ९ जुलैला होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना १२ जुलैला ओवलवर, तर तिसरा एकदिवसीय सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळविण्यात येणार आहे.
मात्र, यापूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड सोबत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये २ जूनला पहिला कसोटी सामना लॉर्ड्सवर होणार आहे. तर १० जूनला दुसरा आणि २३ जूनला तिसरा कसोटी सामना अनुक्रमे ट्रेंट ब्रिज आणि हेडिंग्लेच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ एका मोठ्या कालावधीसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे उभय दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील मालिका खेळणार आहेत. एकदिवसीय सामन्यापासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ज्याचा पहिला सामना १९ जुलैला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना २२ जुलैला आणि तिसरा एकदिवसीय सामना २४ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
यानंतर दोन्ही संघ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार, जो २७ जुलै सुरु होऊन ३१ जुलैला संपणार. तसेच ३ कसोटी सामने अनुक्रमे १७ ऑगस्ट, २५ ऑगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी सुरु होतील.
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये केवळ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आला आहे. ज्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. दरम्यान, सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यानंतर भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली आहे. पाचवा कसोटी सामना इंग्लंडच्या मॅंचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात शुक्रवार (१० सप्टेंबर) पासून खेळवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–शिखर धवन पूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटपटूंचाही झाला होता घटस्फोट; एक आहे भारताचा माजी कर्णधार
–गेल्या ८५ वर्षात भारताने मँचेस्टरचे मैदान एकदाही केले नाही काबीज; अशी आहे ओल्ड ट्रॅफर्डवरील एकूण कामगिरी
–मी ‘वन डायमेंशनल खेळाडू’ नव्हे तर उत्कृष्ट अष्टपैलू; टी२० विश्वचषकासाठी कृणालने ठोकली दावेदारी