भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरीस आता अनेक वाद समोर येत आहेत. त्यातील बहुतांश वाद हे जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाबाबत आहेत. त्यातच असेही वृत्त समोर आले होते की भारताला क्वारंटाईनच्या कठोर नियमामुळे ब्रिस्बेन येथे शेवटचा सामना खेळायचा नाही. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मोठे विधान याबाबत केले आहे.
मांजरेकरांचे मोठे भाष्य –
मांजरेकर यांनी ट्विटरचा आधार घेत म्हटले आहे की ‘हे खरंतर खुप सोपे आहे. एकतर तुम्ही संघनिवडीसाठी उपलब्ध राहू नका किंवा निवड झाली आहे तर आहे त्या जैव-सुरक्षित वातावरणाचा सन्मान करुन नियमांचे पालन करा. तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करु शकत नाही.’
It’s quite simple really. Either rule yourself out for selection or once selected respect the bio bubble & the strict protocols. Can’t have it both ways.#INDvsAUSTest
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 4, 2021
…म्हणून ब्रिस्बेनमध्ये सामना नको
खरंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे. सिडनीमध्ये मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले असल्याने तिथून बाहेर जाणाऱ्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन रहावे लागते. त्यामुळे जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनीतून ब्रिस्बेनमध्ये येतील तेव्हा त्यांना दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
त्यामुळे भारतीय संघ ब्रिस्बेन येथे खेळण्यास नकार देत आहे. भारतीय खेळाडू याआधीच दुबईत आयपीएल दरम्यान क्वारंटाईनमध्ये होते. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात आल्यानंतरही क्वारंटाईन झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा क्वारंटाईन होण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनी येथेच खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यानंतर क्विन्सलँड येथील क्रीडामंत्री टिम मंडेर यांनी म्हटले आहे की “जर भारतीय संघाला आमच्या नियमांनुसार चालायचे नसेल, तर त्यांनी चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला येऊ नये.”
त्यामुळे आता हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे की चौथ्या कसोटीबाबत काय निर्णय घेतला जाणार.
महत्त्वाच्या बातम्या –
दशकानंतर आता शतकावरही राज्य! डेली टेलिग्राफच्या ‘या’ यादीत कोहली दुसर्या क्रमांकावर
…अन् मॉर्केलला षटकार ठोकत सचिन तेंडुलकरने पूर्ण केले ‘ते’ ऐतिहासिक शतक
रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता






