---Advertisement---

विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का

On: मंगळवार, मार्च 3, 2020 12:42 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात काल(2 मार्च) ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा 4 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. मात्र आता त्यांच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसा पेरी दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

तिला न्यूझीलंडविरुद्ध खेळताना गंभीर दुखापत झाली आहे.  या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईनला धावबाद करण्याच्या प्रयत्नात असताना पेरीच्या उजव्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण (हॅमस्ट्रिंगची दुखापत) आला. त्यामुळे तिला मैदानातून चालतानाही त्रास झाला. या दुखापतीमुळे ती लगेचच मैदानाबाहेर गेली. तसेच तिने उर्वरित सामन्यात क्षेत्ररक्षणही केले नाही.

पेरीच्या पायाचे मेलबर्नमध्ये सोमवारी रात्री स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये तिला गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ती उर्वरित महिला टी20 विश्वचषक तसेच त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही बाहेर पडली आहे.

टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया तिची बदली खेळाडू म्हणून कोणाचीही निवड करणार नाही.

पेरीच्या दुखापतीबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर पिप इंग म्हणाले, ‘एलिसाच्या उजव्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण आला आहे. ही गंभीर दुखापत असून तिला यामुळे बराच काळ खेळापासून दूर रहावे लागणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या त्या खेळाडूला रोहित शर्माने केला हा मेसेज

“भारतासारख्या जागतिक दर्जाच्या संघाला पराभूत करून समाधान वाटले”

विराट कोहलीने सांगितली न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामागील कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---