---Advertisement---

‘त्यांच्यासोबतच असे झाले पाहिजे’, दिप्ती शर्माच्या रन आउट वादावर बोलली एलिस पेरी

On: गुरूवार, सप्टेंबर 29, 2022 8:29 PM
Ellyse Perry
---Advertisement---

भारतीय महिला संघाची अष्टपैलू दिप्ती शर्मा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या  आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तिने चार्ली डीन हिला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्यामुळेच ही चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक दिग्गजांनी दिप्तीवर निशाणा साधला होता. ऑस्ट्रेलियन महिला संघाची अष्टपैलू एलिस पेरी हिनेही आता याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एलिसने याविषयी बोलताना इंग्लंडवर एकप्रकारे निशाणाच साधण्याचे काम केले आहे. 

भारतीय महिला संघाने या इंग्लंड दौऱ्या यजमान इंग्लंडला (0-3) असा क्लीन स्वीप दिला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ विजयाच्या अगदी जवळ होता. पण दिप्तीने शेवटच्या विकेटसाठी चार्ली डीन (Charlie Dean) हिला नॉनस्ट्राईक एंडवर धावबाद केले. दिप्तीने हा चेंडू फलंदाजाकडे टाकण्याऐवजी हातात ठेवला होता. डीन क्रीज सोडून पुढे गेल्यानंतर तिने संधी साधली आणि चेंडू स्टंपला लागला. पूर्वी या पद्धतीला मांकडिंग म्हटले जात होते, पण एमसीसीने काही महिन्यांपूर्वीच याला धावबाद म्हणून घोषित देखील केले. अनेकांच्या मते ही पद्धत चुकीची आहे, पण एमसीसीने यात काहीच चुकीचे नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेकदा या मुद्यावरून वाद झाल्याचे पाहिले गेले आहे.

ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी (Ellyese Perry) या मुद्यावर बोलत असताना एकप्रकारे इंग्लंड संघावरच निशाना साधल्याचे पाहायला मिळाले. द ग्रेड क्रिकेटर या पॉडकास्टवर बोलताना एलिस म्हणाली की, “माझ्या मेत जर एकंदरीत पाहिले तर, अशा पद्धतीने धावबाद करणे योग्य नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने धावबाद नाही केले पाहिजे, पण जर तुम्हाला करायचेच असेल, तर इंग्लंडसोबतच करा.”

दरम्यान, एमसीसीने मांकडींगला मान्यता देत तो धावबाद करण्याचाच एक प्रकार असल्याचे सांगितले असले, तरी अनेकांचा यासाठी विरोध कायम आहे. दिप्तीने जेव्हा चार्ली डीनची विकेट घेतली, तेव्हा तिला याबाबत जराही कल्पना नसल्याचे दिसले होते. अनेकांच्या मते गोलंदाजाला अशा पद्धतीने विकेट घेण्यासाठी सलहीली अधिकची मेहनत घ्यावी लागत नाही. तर अनेकांनी हे खेळाडू वृत्तीच्या विरोधात असल्याचेही सांगितले. इंग्लंडच्या अनेका आजी माजी खेळाडूंनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना
जसप्रीत बुमराहच्या जागी टी20 विश्वचषकात ‘यांनाच’ घ्या! एक तर रिजर्वमध्येही नाही
INDvSA: नवीन चेंडूने अर्शदीपचा कहर, स्वत:च सांगितले भन्नाट गोलंदाजीचे रहस्य  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---