पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सीगफ्राइड एकमॅन मागच्या आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसताना संघाला मार्गदर्शन करत होते. अशात अखेर त्यांनी मायदेशात माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान हॉकी परिषदेच्या एका सूत्राकडून या प्रकरणातील महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रशिक्षक मायदेशात अखेर का परतले, याविषयी या सूत्राने सविस्तर माहिती दिली आहे.
सूत्रांच्या माहितीतनुसार पाकिस्तान हॉकी परिषदेकडून (PHF) सीगफ्राइड एकमॅन (Siegfried Aikman) यांना आठ महिने वेतन दिले नाही. तसेच त्यांनी मायदेशात जाण्यामागे फक्त हे एकच कारण नाही. परिषदेत सामील असलेल्या इतर पाकिस्तानी प्रशिक्षकांकडून देखील या प्रकरणात अनावश्यक हस्तक्षेप केला जात होता. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून एकमॅन यांना पाकिस्तान हॉकी संघाची साथ सोडली असून आता मायदेशात परतले आहेत. एकमॅन मुळेच नेदरलँडचे राहणारे आहेत आणि ते आता घरी पोहोचेल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी सांगितले की, “पीएचएफपासून ते पाकिस्तान क्रीडा बोर्डापर्यंत वेतानासाठी धैर्य दाखवत वेतनासाठी वाट पाहिल्यानंतर एकमॅन स्वदेशीत परतले आहेत. पण मागच्या आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, तेव्हा कुठे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता खूप झाले आता घरी जाणे योग्य असेल, या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.”
पीएचएपच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मात्र वेगळे कारण दिले गेले आहे. अधिकाऱ्यांनी एकमॅन मायदेशात परण्यामाचे कारण सांगितले की, “राष्ट्रीय संघाला आगामी काळात कोणतीच स्पर्धा खेळायची नाहीये. या महिन्याच्या अखेरीपर्यं प्रशिक्षकांना त्यांचे सर्व पैसे दिले जातील. कारण त्यांचे वेतन पीएसबी देत असते.” दरम्यान, पाकिस्तान हॉकी परिषद मागच्या मोठ्या काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि खेळाडू देखील या कारणास्तव त्रस्त आहेत.
एकमॅनने संघाची साथ सोडण्यापूर्वी एका अधिकाऱ्याला सांगितले होते की, संघ उपाशी पोटी आणि आर्थिक अडचणींसह आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले प्रदर्शन करू शकत नाही. त्यांचे हे वक्तव्य प्रत्यक्षात उतरताना देखील दिसत आहे. पाकिस्तान संघाने नुकत्याच पार पडलेल्या मलेशिया अलन शाह चषकात, तसेच दक्षिण आफ्रिका एफआयएच सुपर हॉकी लीगमध्ये भाग घेतला होता. पण त्याठिकाणी संघाला निराशा हाती आली. यावर्षी आशिया चषकात आणि कॉमनवेल्थ गेम्समध्येही संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. (Embarrassing! Pakistan team coach returned home, board did not pay eight months salary)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो ‘एवढा’ पैसा, आकडा वाचून येईल आकडी
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध करू शकतो संघपुनरागमन






