अमेरिकन ओपन २०२१ (यूएस ओपन) स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून इंग्लंडच्या एमा रादूकानूने इतिहासाला गवसणी घातली आहे. ती क्वालिफायरच्या रुपात या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर अंतिम सामन्यात विजय मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमा रादूकानुची लढत कॅनडाच्या लेला एनी फर्नांडिससोबत पार पडली. एमाने अंतिम सामन्यात एनीला ६-४,६-३ ने पराभूत करत अमेरिकन ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
अमेरिकन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्वांनाच माहीत होते की, यंदा नवीन विजेता मिळणार आहे. कारण दोन्हीही खेळाडू आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. एमाने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. हीच सुवर्ण कामगिरी तिने अंतिम सामन्यात देखील सुरू ठेवली.
https://twitter.com/TennisChanneli/status/1436814796007952387?s=20
अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर एमाला विश्व रँकिंगमध्येही चांगलाच फायदा होणार आहे. सध्या ती १५० व्या क्रमांकांवर आहे. एमा जेव्हा २ वर्षांची होती, त्यावेळी तिची आई चीनहून इंग्लंडला शिफ्ट झाली होती. तिने वयाच्या ५ व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली होती. तसेच यावर्षी झालेल्या विंबल्डन स्पर्धेत तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. (Emma raducanu won American open finals)
#USOpen champion @EmmaRaducanu has a special message for all of you: pic.twitter.com/eWtfe7PQ7a
— US Open Tennis (@usopen) September 12, 2021
एमा रादूकानु ही अवघ्या १८ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात तिने मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर चाहते तिचे कौतुक होताना दिसून येत आहेत. दरम्यान एमा रादूकानुने देखील सामना झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ अमेरिकन ओपनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी
गेल्या ३ वर्षात एकही ग्रँड जिंकले नसले, तरी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडरर ठरतोय भल्याभल्यांना भारी