---Advertisement---

यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 6:50 PM
djokovich
---Advertisement---

युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) यंदाच्या यूएस ओपनमध्ये महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्यांच्या बक्षीसांची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी या दोन्ही स्पर्धांच्या विजेत्यांना २०१९ च्या तुलनेत ३५ टक्के कमी बक्षीस रक्कम मिळेल. मात्र, स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आणि पहिल्या तीन फेऱ्या गाठणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा मंगळवारपासून (२४ ऑगस्ट) पात्रता फेरीने सुरु झाली.

आता मिळणार इतकी रक्कम
स्पर्धेच्या आयोजकांनी सोमवारी जाहीर केले की, यावर्षी खेळाडूंना या स्पर्धेत सुमारे ४ अब्ज २६ कोटी रुपयांची ( ५७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) बक्षीस रक्कम दिली जाईल. २०१९ मध्ये हा आकडा ५७.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होता. त्यानंतर २०२० मध्ये ५३.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम देण्यात आलेली.

विजेत्यांना दिली जाणार इतकी बक्षिस रक्कम
या वर्षी महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्याला प्रत्येकी २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके रोख बक्षीस दिले जाईल. गेल्या वर्षी, या विजेत्यांना प्रत्येकी ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम देण्यात आली होती. तर, २०१९ मध्ये प्रत्येक एकेरी विजेत्याला ३.८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके रोख बक्षीस देण्यात आलेले. २०१२ नंतर यूएस ओपनच्या विजेत्यांना देण्यात आलेली ही सर्वात कमी बक्षिसाची रक्कम आहे. त्यावर्षी महिला आणि पुरुष एकेरी विजेत्यांना १.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके रोख बक्षीस देण्यात आलेले.

या खेळाडूंना विजेतेपदाची संधी
वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वांची नजर पुन्हा एकदा अव्वल मानांकित नोवाक जोकोविचवर असेल. त्याच्याकडे वर्षातील सर्व ग्रँडस्लॅम जिंकण्याची अनोखी संधी चालून आली आहे. दुसरीकडे, महिला एकेरीमध्ये ऍश्ले बार्टी व नाओमी ओसाका यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जातेय.

महत्त्वाच्या बातम्या-

जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल

धक्कादायक निकाल! जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाओमी ओसाकाला टोकियो ऑलिंपिकमध्ये पराभवाचा धक्का

नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---