---Advertisement---

‘कर्णधार असो वा नसो…’, केवळ खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या विराटसाठी भावा-बहिणीची भावुक पोस्ट

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 4:08 PM
Virat Kohli with Brother and Sister
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना पार्लच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेत रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुलला सोपवण्यात आले आहे. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच कर्णधार म्हणून नव्हे, तर एक खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. यादरम्यान त्याच्या भावाने आणि बहिणीने एक खास पोस्ट शेअर करत त्याचा उत्साह वाढवला आहे.

विराट कोहलीने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. ही जबाबदारी रोहित शर्माला सोपवण्यात आली होती.

तसेच नुकताच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २- १ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे देखील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता यापुढे तो एक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे.(Instagram post shared by Virat Kohli’s brother and sister)

विराट कोहली अनेक वर्षानंतर केवळ एक फलंदाज म्हणून मैदानात उतरत असताना, त्याच्या भावाने आणि बहिणीने त्याचा उत्साह वाढवला आहे. विराटच्या भावाने एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली होती.

विराट कोहलीचा भाऊ विकास याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “कर्णधार असो किंवा नसो. मला तुला खेळताना पाहण्याचा उत्साह तोच असेल, जेव्हा तू तुझा पहिला सामना ९ वर्षांचा असताना खेळला होतास. चॅम्पियन हा कधीही बदलणार नाही. नेहमीच अभिमान वाटतो.”

https://www.instagram.com/p/CY57zmJPGYl/?utm_medium=copy_link

https://www.instagram.com/p/CY6BSBfL8MO/?utm_medium=copy_link

तसेच त्याची बहीण भावना धिंगरा हिने लिहिले की, “ताठ मान, तोच उत्साह!! खेळावर तसेच प्रेम, पुन्हा तेच करतोय जे तुझ्यात असलेल्या मुलाला करायला आवडतं- फक्त क्रिकेट खेळणं.” विराट कोहलीला या सामन्यात ५१ धावा करण्यात यश आले होते. परंतु, भारतीय संघाने हा सामना ३१ धावांनी गमावला.

महत्वाच्या बातम्या :

धोनीच्या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या कारची भर! लिलावात खरेदी केली ‘ही’ क्लासिक गाडी

धक्कादायक! भारताचे सहा क्रिकेटर कोरोना पॉझिटीव्ह, स्वतः प्रशिक्षकांवर खेळाडूंना पाणी पाजण्याची आली वेळ

हे नक्की पाहा:

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---