सूर्यकुमार यादव आता भारताच्या टी-२० संघातील महत्वाचा खेळाडू बनत चालला आहे. रविवारी (१० जुलै) त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शतक ठोकले. या दमदार प्रदर्शनासाठी सोशल मीडियावर त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. परंतु चर्चा होत आहे ती, रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटची.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा हा शेवटचा सामना नॉटिंघममध्ये खेळला गेला. भारतीय संघाला विजयासाठी या सामन्यात २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघाने मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या. एकटा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोडला, तर भारताचा एकही फलंदाज अर्धशतक किंवा ३० धावा देखील करू शकला नाही. सूर्यकुमारने एकूण ५५ चेंडू खेळले, ज्यामध्ये १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
सूर्यकुमारच्या या खेळीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जवळपास ११ वर्षापूर्वी केलेले एक ट्वीट चर्चेत आले आहे. रोहितने १० डिसेंबर २०११ रोजी हे ट्वीट केले होते. ट्वीटमध्ये त्याने सूर्यकुमारचे भविष्य उज्वल असणार याची खात्री दिली होती. रोहितने त्या दिवशी केलेली भविष्यवाणी सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच्या नॉटिंघम टी-२० सामन्यात खरी करून दाखवली.
रोहितचे जे जुणे ट्वीट व्हायरल झाले आहे, त्यात त्याने लिहिलय की, “चेन्नईत बीसीसीआयचे पुरस्कार नुकतेच संपले आहते… काही चांगले गुणवंत क्रिकेटपटू समोर आले आहेत… भविष्यात मुंबईकर सूर्यकुमार यादव याच्यावर नजर ठेवा.”
Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!
— Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011
दरम्यान, सूर्यकुमारच्या या शतकासाठी अनेक माजी दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. यामध्ये प्रमुख्याने उल्लेख केला पाहिजे तो सचिन तेंडुलकरचा. सचिनने सूर्यकुमारने पॉइंटच्या वरून मारलेल्या षटकाराचे खास कौतुक केले. त्याव्यतिरिक्त सुरेश रैना, इरफान पठाण, अमित मिश्रा अशा अनेकांनी त्याचे कौतुक केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्या बात है! उमेश यादव आता ‘या’ संघाकडून दिसणार खेळताना, व्हिसाही मंजूर
नोवाक जोकोविच विम्बल्डन जिंकल्यावर गवत का खातो? जाणून घ्या कारण