भारत विरुद्ध इंग्लंड (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता यजमान संघाच्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी सावध खेळण्यास सुरूवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता भारताचा पहिला डाव ४१६ धावांत संपुष्टात आला, तर इंग्लंडने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ८४ धावा केल्या होत्या.
खेळपट्टीवर बेअरस्टो १२ धावा आणि स्टोक्स शून्य धावा करत उपस्थित होते. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताने यजमान संघाला धक्का दिला आहे. शार्दुल ठाकुरने स्टोक्सला जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) करवी झेलबाद केले आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.
भारताचा कर्णधार बुमराहने फलंदाजीत चमक दाखवत गोलंदाजीही उत्तम केली आहे. त्याने इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांना लवकरच बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे.
भारताने सातत्य राखत तिसऱ्या दिवशीही यजमान संघाला अडचणीत टाकले आहे. शार्दुलने ३७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टोक्सची विकेट घेतली आहे. स्टोक्सने चेंडू लॉग ऑफला मारला असता बुमराहने हवेत सुर मारत अप्रतिम झेल पकडला आहे. याच दिशेला बुमराहने आधी स्टोक्सचा झेल सोडत जीवदान दिले होते. स्टोक्सने ३६ चेंडूत २५ धावा केल्या आहेत.
A pretty special catch. It's been an enthralling morning.
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/wBr6gvOD6x
— England Cricket (@englandcricket) July 3, 2022
सध्या बुमराह सगळ्या विभागात चमकदार कामगिरी करत आहे. त्याने फलंदाजी करताना १६ चेंडूत नाबाद ३१ धावा आणि गोलंदाजी करत तीन विकेट्सही पटकावल्या आहेत. आता त्याने क्षेत्ररक्षणातही विशेष कौशल्य दाखवत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अँडरसनसोबत २०१४मध्ये झालेल्या वादाचे प्रत्यत्तुर जडेजाने तोंडाने नाहीतर बॅटने दिले
गप्प बस! भर मैदानात विराट आणि बेयरस्टोमध्ये राडा, पंचांच्या मध्यस्थीनंतरही चालू राहिला वाद
…म्हणून मुंबई इंडियन्स आहे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ! बुमराह-ब्रॉडच्या ‘त्या’ षटकाशी आहे कनेक्शन