भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थिती त्याला ही जबाबादीरा सोपवली गेली आहे. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजीसाठी आला आणि सुरुवातीच्या पाच विकेट्स त्यांनी स्वस्तात गमावल्या. उभय संघातील या कसोटी मालिकेत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे.
इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका मागच्या वर्षी सुरू झाली होती, परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना रद्द केला गेला होता. आता हाच सामना १ जुलैपासून बर्मिंघममध्ये पुन्हा आयोजित केला गेला आहे. मागच्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाजांसह कसोटी सामने खेळला होता. मालिकेत आतापर्यंत ६६ विकेट्स फक्त भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत.
एखाद्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमाणाने केलेले हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ६१ विकेट्स घेतल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय वेगवान गोलंदाज या कसाटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन करत आहेत. मालिकते आतापर्यंत त्यांनी एकूण ६६ विकेट्स घेतल्या असून बुमराहचा यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे. बुमराहने या मालिकेत अतापर्यंत २० च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. ६४ धावा देऊन ५ विकेट्स, हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. मोहम्मद सिराजने चालू कसोटी मालिकेत २९ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो सर्वोत्तम प्रदर्शन करणारा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
यादीत तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी आहे, ज्याने मालिकेत आतापर्यंत १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याव्यितिरिक्त शार्दुल ठाकूर ७, उमेश यादवने ६ आणि इशान शर्माने ५ विकेट्स घेतल्या आहेत. इशान शर्माला पाचव्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाहीये. तर दुसरीकडे उमेश यादवला संघात निवडले गेले आहे, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. शार्दुल ठाकूर मात्र पाचवा कसोटी सामना खेळत आहे आणि तो स्वतःचे आकडे सुधरवू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गप्प बस! भर मैदानात विराट आणि बेयरस्टोमध्ये राडा, पंचांच्या मध्यस्थीनंतरही चालू राहिला वाद
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’