इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. मालिकेतील एकही सामना न्यूझीलंडला जिंकता किंवा अनिर्णीत करता आला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी या संपूर्ण मालिकेत ज्या पद्धचीचे प्रदर्शन केले, ते पाहता भारतीय संघासाठी हे चांगले संकेत नाहीत. भारत आणि इंग्लंड यांच्या १ जुलैपासून एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचे विशेषतः दोन फलंदाज भारतीय गोलंदाजांचा घाम कढू शकतात.
मागच्या वर्षी भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिकेतील पहिले चार सामने पूर्ण झाले, पण शेवटचा सामना पूर्ण होऊ शकला नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उभय संघातील शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. आता हाच सामना १ जुलै रोजी पुन्हा सुरू होईल. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) हे दोघे भारतीय संघासाठी या कसोटी सामन्यात घातक ठरू शकतात.
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रुट आणि बेयरस्टोने खूप धावा केल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिले. रुटने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये खेळलेल्या ६ डावात ९९ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या दोन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तसेच बेयरस्टोने या तीन सामन्यांच्या ६ डावांमध्ये ७८.८० च्या सरासरीने ३९४ धावा केल्या. बेयरस्टोने देखील दोन शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने या धावा केल्या. या दोघांची फलंदाजी पाहून चाहते आणि क्रिकेटचे जाणाकार देखील चांगलेच प्रभावित झाले आहेत.
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात जर रुट आणि बेयरस्टो लवकर बाद झाले नाहीत, तर नक्कीच भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. भारतीय गोलंदाजांपुढे या दोघांना स्वस्तात बाद करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, मागच्या वर्षी खेळलेल्या चार कसोटी सामन्यांमधील दोन सामने भारताने, एक सामना इंग्लंडने आणि एक सामना अनिर्णीत झाला होता. भारत सध्या कसोटी मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. अशात शेवटचा सामना भारताला जिंकता आला नाही आणि अनिर्णीत जरी केला, तरी संघ मालिका नावावर करेल. दुसरीकडे इंग्लंडला मालिका अनिर्णीत करायची असेल, तर हा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात विराट नव्हे तर ‘हे’ तिघे ठरतील भारताचे सर्वश्रेष्ठ फलंदाज, माजी दिग्गजाचे सुचक भाष्य
काहीतरी शिजतंय? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत लंडनमध्ये फिरतोय अर्जुन, डिनर डेटचे फोटो चर्चेत
किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल