भारतीय संघाने रविवारी (१७ जुलै) इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ५ विकेट्स राखून जिंकला. या विजयानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही नावावर केली. तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्वावचे योगदान दिले ते, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने. रिषभ पंतने या सामन्यात वैयक्तिक शतक केले आणि टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. रिषभच्या या जबरदस्त प्रदर्शानामागे भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगचा हात असल्याचे समोर येत आहे.
इंग्लंडने या सामन्यात भारताला विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ४२.१ षटकांमध्ये गाठले. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) या सामन्यात एकूण ११३ चेंडू खेळला आणि नाबाद १२५ धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्यानेही उत्कृष्ट अष्टपैलू खेळी केली. प्रथम गोलंदाजी करताना हार्दिकने ७ षटकात २४ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत त्याने ५५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या.
रिषभ पंतच्या या शतकीय योगदानानंतर माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. चाहते या ट्वीटवरून अंदाज बांधत आहेत की, पंतला असे जबरदस्त प्रदर्शन करण्यासाठी युवराजकडून खास मार्गदर्शन किंवा सल्ला मिळाला असावा. ट्वीटमध्ये युवराजने लिहिले आहे की, “असे वाटत आहे की ४५ मिनिटचांची चर्चा सार्थक आली, त्याचा फायदा झाला. खूप चांगला खेळलास रिषभ पंत. तुला अशाच प्रकारे तुझा डाव बनवायचा आहे. हार्दिकची फलंदाजी पाहूनही चांगले वाटले.”
Looks like the 45 minute conversation made sense 😅!! Well played @RishabhPant17 that’s how you pace your ininings @hardikpandya7 great to watch 💪 #indiavseng
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 17, 2022
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ४५.५ षटकांमध्ये सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि ४२.१ षटकात गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी ठरला यशस्वी! रचली विक्रमांची मालिका, यादी पाहाच
श्रीलंकेतील अनागोंदीनंतर क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक