इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आक्रमक पवित्रा आजमावल्यामुळे संघाला त्याचा फायदा झाला. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने, तर शेवटचा सामना इंग्लंडने जिंकला. टी-२० मालिका जिंकल्यानंतर १२ जुलैपासून उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळला जाईल. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही महत्वाची असेल. या मालिकेदरम्यान विराट कोहलीच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय संघाच्या चाहत्यांना विराटकडून एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात खूप अपेक्षा आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघाल्या नाहीत. भारतीय संघ सध्या आक्रमक भूमिकेसह खेळत आहे आणि याच कारणास्तव सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून विराटवर मोठी खेळी करण्याचा दबाव असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विराटला विश्रांती दिली गेली होती. शेवटच्या दोन सामन्यात त्याने अनुक्रमे १ आणि ११ धावा करून विकेट गमावली.
शेवटच्या टी-२० सामन्यात विराटही आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात होता, पण अवघे ६ चेंडू खेळल्यानंतर त्याने विकेट गमावली. त्याने ६ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारून ११ धावा केल्या. विराट या सामन्यात आक्रमक दिसला, पण त्याच्या याच अंदाजाचा त्याला मोबदला म्हणून स्वस्तात विकेट गमवाली लागली.
मागच्या काही दिवासंपूर्वी ऑयन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर जोस बटलरने पहिल्यांदाच संघाच्या नेतृत्वाची धुरा हातात घेतली. कर्णधाराच्या रूपात आणि बटलरचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र समधानकारक राहिले नाही. भारताविरुद्ध तो पहिल्यांच एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. टी-२० मालिकेत अनुक्रमे ०, ४ आणि १८ धावा करून बाद झालेल्या बटलरकडून एकदिवसीय मालिकेत चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहते करत आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेलेले दोन्ही संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, क्रेग ओवरटन, मैथ्यू पार्किंसन, जो रूट, जेसन रॉय, फिल साल्ट, बेन स्टोक्स, रीसे टॉपली, डेविड विली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्या बात है! उमेश यादव आता ‘या’ संघाकडून दिसणार खेळताना, व्हिसाही मंजूर






