भारत आणि इंग्लंड याच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२ सप्टेंबर) सुरू झाला. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत आणि चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेत २-१ अशी आघाडी घेणार आहे. दरम्यान या संपूर्ण मालिकेत उभय संघांच्या दोन खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. हे खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन.
मालिकेतील लाॅर्ड्स आणि लीड्स कसोटी सामन्यांमध्ये तर या दोघांमध्ये वाद झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. मात्र द ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्यांच्यामध्ये वेगळेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले.
लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात विराट आणि अँडरसनमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी विराटने अँडरसनला बोलताना म्हटले होते की, “ही खेळपट्टी आहे आणि तू इथे धावत आहेस, हे तुझे घर नाहीये.”
मात्र ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी याउलट चित्र पाहायला मिळाले, ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसावी. सामन्यादरम्यान विराट अँडरसनच्या एका चेंडूवर बाद होण्यापासून थोडक्यात वाचला होता. यानंतर वेगवान गोलंदाज अँडरसनने नाराज होत स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला होता. अँडरसनने डोक्याला हात लावल्यानंतर विराट त्याच्याजवळ गेला आणि हसत-हसत काहीतरी बोलू लागला आणि अँडरसननेही विराटला हसत-हसत प्रतिक्रिया दिली.
Virat Kohli appreciating James Anderson's bowling. pic.twitter.com/BRyo1CdDfk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2021
https://twitter.com/omrajguru/status/1433406563440476169?s=20
यानंतर जेव्हा पहिल्या सत्राचा खेळल संपला, तेव्हा दोघांना सोबत दिलखुलासपणे बोलत पव्हेलियनमध्ये जाताना पाहिले गेले. यावेळी अँडरसनने कोहलीच्या खांद्यावर हात ठेवल्यासारखेही दिसत होते. विराट आणि अँडरसनमधील मैत्रीपूर्ण संबंध पाहून त्यांच्यातील संघर्ष संपला की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Is this cricket or I m watching drama series. Never mind happy to see both of them together.
Two Goat ????????@imVkohli #JamesAnderson#ENGvIND#IndvsEng pic.twitter.com/GSXs4Sib1S
— Geeta (@Geeta477) September 2, 2021
Nice to see the mutual respect between Virat Kohli and James Anderson. pic.twitter.com/ztNx2iHsm5
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2021
Thanks for template pic.twitter.com/Wod9FltKGo
— Shivani (@meme_ki_diwani) September 2, 2021
दरम्यान चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ओव्हलच्या मैदानात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी संपूर्ण भारतीय संघाला केवळ १९१ धावांवर माघारी धाडला. प्रत्युत्तरात भारताच्या उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनीही संघाला ३ मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर इंग्लंड संघ ३ बाद ५३ धावा अशा स्थितीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल
संयमी अर्धशतकासह कोहली धोनीवर ठरला वरचढ, बड्या विक्रमात बनला ‘कॅप्टन नंबर १’





