---Advertisement---

‘हा कर्णधाराचा निर्णय आहे’, इशांतच्या फिटनेसविषयी शमीने दिली महत्त्वपूर्ण माहिती

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 10:08 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिले दोन्ही दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला केवळ ७८ धावांवर सर्वबाद केले. इंग्लंडच्या संघाने पहिल्याच दिवशी त्यांच्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्ललंडच्या संघाने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या जोरावर ८ विकेट गमावत ४२३ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाने भारतावर ३४५ धावांची आघाडी घेतली आहे.

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावावेळी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने गोलंदाजीदरम्यान छोटे-छोटे स्पेल केलेले दिसले. त्यामुळे त्याच्या फिटनेसविषयी प्रश्न निर्माण होत आहेत.

इशांतने दुसऱ्या दिवशीच्या खेळात छोट्या स्पेल टाकल्या. त्यानंतर त्याच्या फिटनेसवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचे उत्तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दिले आहे. शमीने सांगितले की, हा सिनियर गोलंदाज पूर्णपणे फिट आहे आणि तो गुरुवारी केवळ कर्णधार कोहलीच्या निर्देशांच पालन करत होता.

इशांतने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ २२ षटके गोलंदाजी केली. त्याने केलेल्या षटकांत त्याने ९२ धावा दिल्या. त्याला त्याच्या गोलंदाजीदरम्यान एकही विकेट घेता आली नाही. मोहम्मद शमीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मांध्यामांशी बोलताना इशांतविषयी माहिती दिली.

शमी माध्यामांशी बोलताना म्हणाला, “हे पाहा जेव्हा गोलंदाजाच्या हातातून चेंडू नीट पडत नाही किंवा संघ जास्त वेळ मैदानात असतो, तेव्हा कर्णधार त्याला तीन-चार षटकांच्या छोट्या स्पेल देऊ लागतो. तुम्हाला कसोटी सामन्यात सलग ७-८ षटकांचा स्पेल टाकण्याची आवश्यकता नसते. हे परिस्थिती आणि गोलंदाजाच्या लयीवरही अवलंबून असते, हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही पाहिलेच असेल इशांतने डावाची सुरुवातही केली आणि डावाचा अंतही केला. त्यामुळे त्याच्या फिटनेसविषयी कसलीच शंका नाही. ही गोष्ट केवळ एवढीच आहे की, कर्णधाराला पाहावे लागते की कोणत्या गोलंदाजाला सर्वाधिक गरज आहे, त्याला किती षटके द्यायचे आहेत, किती छोटा किंवा मोठा स्पेल द्यायचा आहे. हा कर्णधाराचा निर्णय आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कर्णधार’ रुटचा २०२१ सालात कहर; आता पॉन्टींगचा ‘तो’ मोठा विश्वविक्रम आहे नजरेच्या टप्प्यात

कर्णधार कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच घडली नकोशी गोष्ट; इंग्लंडने स्वत:चाच विक्रम टाकला मागे

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---