भारत आणि इंग्लंड याच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी भारतीय खेळाडूंसोबत पुन्हा एकदा गैरवर्तन केले आहे. आधी केएल राहुल आणि आता मोहम्मद सिराज यांना इंग्लंडच्या चाहत्यांनी निशाणा बनवले आहे. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी मैदानातील इंग्लंडच्या चाहत्यांनी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजकडे चेंडू फेकला. या गोष्टीची माहिती भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने दिली.
रिषभ पंतने सांगितले, कर्णधार विराट कोहलीला प्रेक्षकांनी सिराजसोबत केलेल्या या गैरवर्तनमुळे राग आला होता. त्याने सिराजला चेंडू बाहेर फेकायला सांगितला. ही घटना टिव्हीवर देखील दिसली. मोहम्मद सिराजला यापुर्वी ऑस्टेलियातही प्रेक्षकांच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर पंतने माध्यामांशी बोलताना सांगितले की, “मला वाटते गर्दीमधील कोणीतरी सिराजवर चेंडू फेकला, ज्यानंतर कोहली नाराज झाला. तुम्हाला जे करायचे ते करा, पण खेळाडूंवर सामान फेकू नका. मला वाटते हे क्रिकेटसाठी चांगले नाही.” ही पहिली वेळ नाही, जेव्हा इंग्लंडच्या चाहत्यांनी विरोधी संघासोबत असे गैरवर्तन केले आहे. याआधी लाॅर्ड्सवरच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या केएल राहुलला प्रेक्षकांनी शँपेनच्या बाटल्यांची टोपने फेकून मारली होती. त्यावेळीही भारतीय कर्णधार विराट कोहली खूप रागावलेला दिसला होता.
तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत
मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून सुरू झाला असून सामन्याच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत भारतीय संघाला केवळ ७८ धावांवर सर्वबाद केले आहे.
इंग्लंडला सामन्याच्या पहिल्याच दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ बाद ४२३ धावा केल्या आहेत. इंग्लंडने भारतीय संघावर सध्या ३४५ धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार जो रूटने संघासाठी अप्रतिम १२१ धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजीमध्ये ९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना ‘या’ गोलंदाजानी दिला सर्वाधिक त्रास
भारतीय संघ अडचणीत, पण मोहम्मद शमीने केलाय ‘मोठा’ विक्रम; कपिल देव, कुंबळेच्या पंक्तीत स्थान
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक