भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याच्या मते आता वेळ आली आहे की, भारतीय संघामध्ये काही महत्वाचे बदल केले गेले पाहिजेत. इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटीत भारतीय संघ ७ विकेट्सने पराभूत झाला. या सामन्यात भारताचे काही खेळाडू अपयशी ठरले, ज्यानंतर संघातील त्यांचे स्थान निश्चित मानले जात नाहीये. जाफरच्या मते या खेळाडूंच्या जागी युवा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याला संघात संधी मिळाली पाहिजे.
इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटीत खासकरून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांनी चाहत्यांची निराशा केली. विहारीने या समन्याच्या पहिल्या डावात २०, तर दुसऱ्या डावात ११ धावा केल्या. दुसरीकडे सरफराज खानने रणजी ट्रॉफीच्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात जबरदस्त प्रदर्शन केले होते. जाफरच्या मते सरफराज त्याच्या रणजी ट्रॉफीतील प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील हनुमा विहारीची जागा बळकावू शकतो. सरफराजने रणजी ट्रॉफीच्या २०१९-२० हंगामात ९२८ धावा केल्या होत्या, तर २०२१-२२ हंगामात ९८२ धावा केल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेची बोलताना जाफर म्हणाला की, “सरफराज खान, जो संधीची वाट पाहत आहे आणि ज्याने रणजी ट्रॉफीमध्येही अप्रतिम प्रदर्शन केले, तो हनुमा विहारीच्या अडचणी वाढवेल, यात शंका नाहीये. ”
एजबस्टन कसोटीत भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gilll) देखील अपयशी ठरला होता. गिलने सामन्याच्या पहिल्या डावात १७, तर दुसऱ्या डावात ४ धावा करून विकेट गमावली. जाफरच्या मते गिलला संघ व्यवस्थापनाने मध्यक्रमांत आजमावले पाहिजे. तो म्हणाला की, “शुबमन गिलला मध्यक्रमात आजमावले पाहिजे. तो खूप गुणवंत खेळाडू आहे, पण सलामीवीर ही त्याच्यासाठी योग्य जागा नाहीये. शार्दुल ठाकुरला फक्त एक सामना झाल्यानंतर संघातून वगळले पाहिजे.”
जाफरने पुढे अशीही शक्यता वर्तवली की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: इंग्लंडमध्ये झाले धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन, रिषभ पंतही होता उपस्थित
‘या गोष्टीचे परिणाम येणाऱ्या काळात जाणवतील’, इंग्लंड दौऱ्याबाबत कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान
‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा