टी-20 विश्वचषक 2022 मध्ये विजेतेपदासाठी पाकिस्तान आणि इंग्लंड रविवारी (13 नोव्हेंबर) आमने सामने होते. इंग्लंडने गुरुवारी (10 नोव्हेंबर) उपांत्य सामन्यात भारताला 10 विकेट्से मात दिल्यानंतर अंतिम सामन्यासाठी जागा पक्की केली. कर्णधार जोस बटलरने या उपांत्य सामन्यात नाबाद 80 धावा केल्या होत्या. अंतिम सामन्यात मात्र तो 26 धावा करून बाद झाला. पाकिस्तानविरुद्धच्या 26 धावांच्या खेळीनंतर बटलर टी-20 विश्वचषक 2022 च्या नॉकआउट फेरीत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.
जोस बटलर (Jos Buttler) याने भारताविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात नाबाद 80 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी संघाच्या विजयात महत्वाची ठरली होती. रविवारी पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळताना देखील बटलरकडून अशाच खेळीची अपेक्षा होती, परंतु त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. बटलर या सामन्यात 26 धावा करून यष्टीरक्षका मोहम्मद रिझवानच्या हातात झेलबाद झाला. अंतिम सामन्यात बटलर अपेक्षित खेळी करू शकला नाही, पण त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद मात्र नक्कीच झाली. तो टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीत यावर्षी सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला. टी-20 विश्वचषकाच्या आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर बटलर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बटलनरे उपांत्य सामन्यात 80 आणि अंतिम सामन्यात 26 धावा केल्या, म्हणजेच त्याने यावर्षीच्या बाद फेरीतल 106 धावा केल्या. या धावा इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बटलर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे, ज्याने 2014च्या विश्वचषकात बाद फेरीमध्ये तब्बल 149 धावा केल्या होत्या. बटलर यावर्षी बाद फेरीत विरोधकांसाठी बाधा ठरला असला, तरी तो विराटचा हा विक्रम मात्र मोडू शकला नाही. यादीत तिसऱ्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आहे, ज्याने 2009 सालच्या टी-20 विश्वचषकात बाद फेरीमध्ये 105 धावा केल्या होत्या. यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श (105), तर पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा सॅम्युअल बद्री (104) आहे
टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक धावा करणारे फळंदाज
149 – विराट कोहली (2014)
106 – जोस बटलर (2022)
105 – शाहिद आफ्रिदी (2009)
105 – मिचेल मार्श (2021)
104 – सॅम्युअल बद्री (2012)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबरच्या बॅटमध्ये दम नाही! आशिया चषक आणि टी20 विश्वचषकात ‘एवढं’ सोपं काम करण्यात अपयशी
आदिल रशिदने बाबर आझमला कसे आपल्या जाळ्यात फसवले एकदा पाहाच, आयसीसीने शेयर केला व्हिडिओ