आयपीएल 2024 च्या हंगामात जोस बटलर राजस्थान राॅयल्स संघाचा भाग होता. मात्र इंग्लंडच्या पाकिस्तान विरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी तो आयपीएलचा उर्वरित हंगाम मध्येच सोडून मायदेशी रवाना झाला. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान 4 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेला 22 मे पासून सुरुवात होईल. तत्पूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार जोस बटलर मालिकेतील काही सामने अथवा संपूर्ण टी20 मालिकेलाच मुकण्याची शक्यता आ्हे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोस बटलर कौटुंबिक कारणामुळे पाकिस्तानविरुद्धचे काही सामने गमावू शकतो. बटलर त्याच्या पत्नीला होणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे टी20 मालिकेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तो इंग्लंड संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2024 मध्ये राजस्थानकडून खेळताना बटलर चांगल्या फाॅर्ममध्ये होता. त्याच्या या फाॅर्मचा इंग्लंड संघाला खूप फायदा होणार होता. परंतु आता त्याच्या अनुपस्थितीचा संघाला मोठा फटका बसू शकतो.
जोस बटलर आगामी टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा कर्णधार असणार आहे. बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडनं उत्तम कामगिरी केली आहे. बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडनं 2022 टी20 विश्वचषक जिंकला होता.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मालिकेतील पहिला सामना 22 मे रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे. दुसरा सामना 25 मे रोजी एजबेस्टन मैदानावर तर तिसरा सामना 28 मे रोजी कार्डिफ मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 मे रोजी लंडनला खेळला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होईल.
महत्वाच्या बातम्या-
हरभजन सिंग बनणार टीम इंडियाचा नवा हेड कोच? बीसीसीआयकडून मिळाली मोठी ऑफर!
गौतम गंभीरचा निवडकर्त्यांवर मोठा आरोप; म्हणाला, “मी पाया पडायचो नाही म्हणून…”