---Advertisement---

सुपरफास्ट सॅम बिलिंग्स! बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त थ्रो करत उडवल्या बेल्स, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना शनिवारी (२६ जून ) झाला. या सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाने श्रीलंका संघावर ८९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सॅम बिलिंग्सने धावबाद करण्यासाठी केलेला थ्रो सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याने केलेल्या थ्रोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इंग्लंड संघाने कुटल्या १८० धावा..

या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघातील सलामी फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंड संघाकडून डेविड मालनने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. तर जॉनी बेअरस्टोने ४३ चेंडूंमध्ये ५१ धावा ठोकल्या.यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर श्रीलंकन संघाकडून गोलंदाजी करताना दुष्मंता चामिराने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. २० षटकांअखेर इंग्लंड संघाला ६ गडी गमावून १८० धावा करण्यात यश आले होते.(Eng vs SL fielder standing near boundary line blew bails direct throw watch video)

सॅम बिलिंग्सचा जबरदस्त थ्रो

इंग्लंड संघाने दिलेल्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाचे अवघ्या ६० धावांवर ४ गडी माघारी परतले होते. तसेच श्रीलंकन फलंदाज, दसून शनाका आणि यष्टीरक्षक फलंदाज, निरोशन डिकेवाला यांना खेळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अशातच ख्रिस वोक्स १२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दशून शनाकाने मिड ऑन आणि मिड विकेटच्यामधून सीमा रेषेच्या दिशेने शॉट खेळला.

दशुन या शॉटवर २ किंवा ३ धावा घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे त्याने पहिली धाव जोरात घेतली. परंतु, तो दुसरी धावा घेण्यासाठी धावणार इतक्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सॅम बिलिंग्सने नॉन स्ट्राइकच्या दिशेने वेगवान थ्रो केला आणि यष्टया उधळल्या. दनुश क्रिजमध्ये बॅट ठेवण्यापूर्वीच तो बाद झाला होता. सॅम बिलिंग्सने केलेला हा थ्रो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका संघात २९ जूनपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लाईव्ह सामन्यात पुरुष दर्शकाने केले ‘अश्लील कृत्य’, व्हिडिओ व्हायरल

“टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तटस्थ क्युरेटर्स वापरा”, भारतीय दिग्गजाचा आयसीसीला सल्ला

विराट आणि रोहितच्या नेतृत्त्वपदावरुन भिडले भारत-पाक दिग्गज, पाहा कोणी कोणाला दिला पाठिंबा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---