भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्णपणे भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. धावांचा डोंगर उभारण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी लवकर माघारी धाडले. इंग्लंडचा डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला होता. चला तर पाहूया भारतीय गोलंदाजांची पहिल्या डावातील कामगिरी.
🏴 𝔸𝕃𝕃 𝕆𝕌𝕋 on Day 1️⃣
Indian seamers converted the close calls from the earlier session into 🆆🅸🅲🅺🅴🆃🆂, bowling out England for 1️⃣8️⃣3️⃣
4️⃣ for Bumrah
3️⃣ for Shami
2️⃣ for Shardul &
1️⃣ for Siraj#OneFamily #MumbaiIndians #ENGvIND @BCCI pic.twitter.com/DibtqjLYOZ— Mumbai Indians (@mipaltan) August 4, 2021
बुमराहने घेतले ४ बळी
गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलेला जसप्रीत बुमराह या डावात मात्र फॉर्ममध्ये आल्याचे दिसून येत आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या वेगवान आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. त्याने सलामी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉरी बर्न्सला खातेही खोलू दिले नाही. त्याला ५ व्या चेंडूवर पायचीत करत जसप्रीत बुमराहने माघारी धाडले.
त्यानंतर इंग्लंड संघाचा विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याने देखील जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीसमोर नांगी टाकली. ५५ वे षटक सुरू असताना जसप्रीत बुमराहने ओवर द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला. तो चेंडू जोस बटलरला कळालच नाही आणि तो एकही धाव न करता रिषभ पंतच्या हातून झेल बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शेवटी त्याने स्टुअर्ट ब्रॉडला अप्रतिम स्विंग होणारा चेंडू टाकत ४ धावांवर पायचीत करत माघारी धाडले; तर जेम्स अँडरसनला ० धावांवर त्रिफळाचित करत तंबूत पाठवले.
India start the Test series with a bang.
Live Scorecard & Videos: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/dqKg5gHnoh
— England Cricket (@englandcricket) August 4, 2021
ENGLAND HAS BEEN BOWLED OUT FOR 183!! ☝🏽
This time there is no leg in between 😉Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #JaspritBumrah pic.twitter.com/r3ztimhB6a
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2021
King Kohli had made the judgement much before it happened 😌
Another batsman goes for a duck, this time it is Jos Buttler ☝🏽Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #ViratKohli pic.twitter.com/eDUek9am1L
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2021
मोहम्मद शमीने घेतले ३ बळी
मोहम्मद शमीने देखील भारतीय संघाला जोरदार सुरुवात करून दिली. त्याने डॉम सिब्लीला अवघ्या १८ धावांवर माघारी धाडले. तर चांगली फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टोला २९ धावांवर पायचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोहम्मद शमीने डॅनियल लॉरेन्सला खातेही खोलू दिले नाही.(England all out on 183 in first innings, see indian Bowlers performance)
Mohammed Shami on 🔥
Sends back Dan Lawrence for a duck!Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #MohammedShami pic.twitter.com/azwcOBMBCF
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2021
शार्दुलने रूटला बाद करत घेतले २ बळी
इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने एकहाती झुंज दिली. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जो रूटने या डावात ६४ धावांची संयमी खेळी केली. तो शतक झळकावण्याच्या वाटेवर असताना शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत माघारी धाडले. शार्दुलने त्याला आत येणारा चेंडू टाकला, जो त्याला कळालच नाही आणि तो पायचीत होऊन माघारी परतला. याच षटकात त्याने ऑली रॉबिन्सनला भोपळाही न फोडता माघारी धाडले.
This moment made me go ______💙#ENGvINDpic.twitter.com/Mr5mbaqD0r
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 4, 2021
सिराजची एकमेव विकेट
या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जॅक क्राउलीने २८ धावांची खेळी केली. तो अर्धशतक करण्याच्या दिशेने पुढे जात असताना, सिराजने ओवर द विकेटचा मारा करत अप्रतिम आत येणारा चेंडू टाकला, जो बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंतने सॅम करनचे गॉगल चोरले?’ रिषभच्या ‘त्या’ गॉगल्सचीच सगळीकडे चर्चा
Video: पंतच्या हट्ट ठरला टीम इंडीयासाठी फायदेशीर, डीआरएससाठी विराटला समजवल्याने मिळाली मोठी विकेट