---Advertisement---

IND VS ENG; इंग्लंंडचा कमबॅक, राजकोटमध्ये भारताचा निसटता पराभव

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांंच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला फक्त 145 धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले आहे. पण भारत अजूनही 2-1 ने पुढे आहे. राजकोटमध्ये भारताकडून हार्दिक पांड्याने 40 धावा केल्या. तर वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून बेन डकेटने अर्धशतक झळकावले.

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला. त्यासाठी हार्दिक पांड्याने 40 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. ज्यात त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेलने 15 धावा जोडल्या. त्याने 2 चौकार मारले. अशाप्रकारे भारताला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन फक्त 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. सॅमसननंतर अभिषेक शर्माची विकेट पडली. तो 14 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तोही 18 धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर फक्त 6 धावा करून बाद झाला.

इंग्लंड संघाकडून बेन डकेट सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. त्याने 28 चेंडूंचा सामना करत 51 धावा केल्या. डकेटने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तर लियम लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या. त्याने 5 षटकार आणि 1 चौकार मारला. कर्णधार जोस बटलरने 24 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे, इंग्लंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 171 धावा केल्या.

भारताकडून वरुण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 24 धावा देत 5 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 4 षटकांत 33 धावा देत 2 बळी घेतले आहेत. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर टीम इंडियात परतला. पण तो काही खास करू शकला नाही. शमीने 3 षटकांत 25 धावा दिल्या. पण, एकही विकेट घेतली नाही.

हेही वाचा-

‘आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराह म्हणाला…
IND vs ENG; चक्रवर्तीने घेतली इंग्लंडची फिरकी, विजयासाठी भारताला 172 धावांची गरज
IND vs ENG; वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिल नेट्समध्ये वडिलांसोबत करतोय सराव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---