---Advertisement---

सलग तिसऱ्या पराभवासह भारताने गमावली टी-20 मालिका; आयर्लंडनंतर इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली!

On: शुक्रवार, जुलै 10, 2026 6:52 AM
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या टी-20 IND VS ENG सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्या पराभवामुळे, पाच सामन्यांची मालिका एक सामना शिल्लक असतानाच भारताच्या हातातून निसटली. TEAM INDIA LOSS T20 SERIES ब्रिस्टल येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 गडी राखून पराभव केला. परिणामी मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या पराभवामुळे भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. TEAM INDIA LOSS T20 SERIES VS ENGLAND AFTER 12 YEARS तब्बल 12 वर्षांनंतर भारताला इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पराभव पत्करावा लागला. यापूर्वी 2014 मध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध असा पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच, जवळपास सात वर्षांनंतर भारताने सलग दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. याआधी आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका गमावल्यानंतर, आता इंग्लंडमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, दोन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या सहा मालिकांपैकी भारताने पाच जिंकल्या होत्या, तर एक मालिका बरोबरीत सुटली होती.

पहिल्या तीन सामन्यांनंतर भारत 0-2 अशा पिछाडीवर होता. चौथा सामनाही गमावल्यामुळे इंग्लंडने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता अंतिम सामन्यात प्रतिष्ठेसाठी खेळण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

इंग्लंडच्या या दणदणीत विजयात कर्णधार हॅरी ब्रूक HARRY BROOK आणि सलामीवीर फिलिप सॉल्ट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्धशतके झळकावल्यानंतर हे दोन्ही फलंदाज नाबाद राहिले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 चेंडूंमध्ये 146 धावांची अभेद्य भागीदारी केली. मात्र, जोस बटलरला केवळ 8 धावांवर समाधान मानावे लागले.

या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने SHREYAS IYER नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावांची खेळी केली. तो 80 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोश टोंग आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी केवळ एक गडी गमावून 13.5 षटकांत हे लक्ष्य गाठले. कर्णधार हॅरी ब्रूकने 35 चेंडूंत नाबाद 79 धावा केल्या, तर सलामीवीर फिलिप सॉल्टने 42 चेंडूंत 59 धावांचे योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---