गुरुवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पाकिस्तानचा डाव ३५.२ षटकात १४१ षटकात संपुष्टात आणला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमही पूर्णपणे अपयशी ठरला. तो या सामन्यात शुन्यावर बाद झाला.
बाबर आजम डान्सिंग बॉलवर आऊट झाला
पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाबरला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज शाकिबने गोलंदाजी करत स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे बाबर खाते न उघडताच तंबूत परतला. या वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानी कर्णधारा देखील बाद केले. खरंतर शाकिबने बाबरला आपल्या जाळ्यात अडकवून बाद केले. त्याने बाबरविरुद्ध ऑफ स्टंपला चेंडू फेकला, जो टप्पा पडून थोडा बाहेर गेला. इथंच बाबर फसला आणि त्याने चेंडूला बॅट लावली. त्यामुळे चेंडू बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या जॅक क्रॉलीच्या हातात गेला.
https://twitter.com/englandcricket/status/1413107684010647553
सहा खेळाडूंचे पदार्पण
या सामन्यातून इंग्लंड संघाकडून जॅक क्रॉली, ब्रायडन कार्से, लुइस ग्रेगरी, फिलिप सॉल्ट आणि जॉन सिम्पसन या ५ खेळाडूंनी इंग्लंड संघाकडून पदार्पण केले. त्याचबरोबर पाकिस्तान संघाकडून सउद शकील या खेळाडूने एकदिवसीय पदार्पण केले आहे.
इग्लंडचा एक संघ आयसोलेशनमध्ये
खरंतर पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका सुरु होण्याच्या दोन दिवसापूर्वी इंग्लंडच्या एकदिवसीय संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण एकदिवसीय संघातील खेळाडूंना आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे एका रात्रीत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक नवा संघ उभा करावा लागला. इंग्लंडने या नव्या खेळाडूंच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी बेन स्टोक्सवर टाकली.
इंग्लंडचा विजय
पाकिस्तानने दिलेल्या १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून डेव्हिड मलान आणि जॅक क्रॉली यांनी नाबाद अर्धशतके झळकावत इंग्लंडला २२ व्या षटकातच विजय मिळवून दिला. मलानने नाबाद ६८ आणि क्रॉलीने नाबाद ५८ धावा केल्या. तसेच पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीला एकमेव विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘दादा’च्या घरी पोहोचल्या बंगालच्या मुख्यमंत्री
सौरव गांगुलीने निवडला आपला सर्वकालीन संघ, ‘या’ दोन भारतीयांना दिले स्थान, तर पॉन्टिंगला केले कर्णधार
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकविषयी मोठा निर्णय, प्रेक्षक मुकणार जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला






