गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. टी-२० मालिकेत ३-० ने पराभूत झाल्यानंतर, वनडे मालिकेतही श्रीलंकन संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा आहे. रविवारी (४ जुलै) रोजी पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने एक चेंडू टाकला होता, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाच्या कर्णधाराने घेतलेला हा निर्णय योग्य ठरताना दिसून येत होता. कारण श्रीलंकन संघाचा डाव पुन्हा एकदा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागला होता. संघाची धावसंख्या ६३ असताना ५ फलंदाज माघारी परतले होते. इंग्लंड संघाकडून वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स, डेव्हिड विली आणि टॉम करन हे तिघेही गोलंदाज श्रीलंकन फलंदाजांना अडचणीत टाकण्याचे काम करत होते. (england bowler david willey waved the ball in the air in a tempting manner the batsman got out watch viral video)
या डावात श्रीलंकन संघाचा फलंदाज पथुम निसानका याला डेव्हिड विलिने उत्कृष्ट आऊट स्विंग चेंडू टाकून माघारी धाडले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये डेव्हिड विलीची गोलंदाजी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. याचे कारण असे की, फलंदाज पथुम निसानका याला डेव्हिड विलिने टाकलेला चेंडू कळलंच नाही की आउट स्विंग होईल की इन स्विंग होईल? त्यामुळेच फलंदाज मोठी चूक करून बसला. विलिने टाकलेल्या चेंडूवर पथुम निसानकाने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरकाक्षकाच्या हातात गेला.
Inswinger ➡ inswinger ➡ outswinger ⬅
Scorecard/clips: https://t.co/litP0weU1U
🏴 #ENGvSL 🇱🇰 pic.twitter.com/WRxYFgcj3K
— England Cricket (@englandcricket) July 4, 2021
या डावात श्रीलंकन संघाकडून प्रथम फलंदाजी करताना दसून शनाकाने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर, वहींदू हंसरंगाने २० धावांचे योगदान दिले. हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या डावातील ४२ वे षटक सुरु असताना पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. ही मालिका इंग्लंड संघाने २-० ने आपल्या नावावर केली.
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान, विरोधकांवर कारवाई
द्रविडने नकार दिल्यास ‘हे’ ३ दिग्गज घेऊ शकतात टीम इंडियाचे महागुरु शास्त्रींची जागा
अस्सल चाहता! १३ वर्षांनंतर शहरात आला माही, एका भेटीसाठी पठ्ठ्याने करुन घेतलं ट्रान्सफर