इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाल्याने आपले नाव मागे घ्यावे लागले. या दरम्यान ब्रॉडने मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार इंग्लंडचे गोलंदाजच भारतीय संघाच्या विजयला कारणीभूत ठरू शकतात.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेला ब्रॉड म्हणाला, “मला झालेली दुखापत ही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटची दुखापत नसणार. यानंतरही अनेक इंग्लंडच्या गोलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता आहे. याला मर्यादित षटकांचे क्रिकेट कारणीभूत आहे. कारण या मालिकेत खेळणाऱ्या जास्त तर, इंग्लंडच्या गोलंदाजांना कसोटी सामन्याच्या सरावाची अधिक संधीच मिळाली नाही. यातील अनेक जण सध्या सुरू असलेली ‘द हंड्रेड’ स्पर्धा आणि इतर टी-२० सामने खेळून सरळ भारताविरुद्धच कसोटी सामना खेळायला आलेत.”
डेली मेलच्या एका स्तंभात ब्रॉडने लिहिले, “या सामन्यात अजूनही काही गोलंदाज दुखापतग्रस्त होण्याची शक्यता आहे. कारण २०२१ मध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचे असे वेळापत्रक होते. ज्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जास्त करून मर्यादित षटकांची क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्यांना भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सामन्यासाठी सराव करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या सामन्यांमध्ये होऊ शकतो.”
इंग्लंडचा गोलंदाज साकिब महमूदचे उदाहरण देत ब्रॉड म्हणाला, “महमूदला भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी इंग्लंडकडून संधी देण्यात आली. परंतु, त्याने गेल्या २ महिन्यापासून कसोटी सामना खेळलेला नाही. अशावेळी विनासराव करता ४-५ दिवसांचा सामना खेळणे कठीण जाते.”
“आम्हाला भारताविरुद्ध कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी सरावासाठी पुष्कळ वेळ मिळाला नाही. काउंटी स्पर्धेमध्ये देखील खूप कमी सामने झाले. त्यामुळे आमच्या संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सॅम करन सारख्या गोलंदाजांना जिथे केवळ ५ चेंडू टाकावे लागत होते. त्यांनाच आता या सामन्यात २० ते २५ षटकं टाकावे लागत आहे. त्यामुळे संघात स्थान मिळण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या, क्रिस वोक्ससारख्या खेळाडूंना आणखीन अडचण निर्माण होत आहे,” असेही ब्रॉड म्हणाला.
ब्रॉड भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. असे असले तरी अँडरसन दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
दरम्यान, हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाल्याने जोफ्रा आर्चरने नाव मागे घेतले होते. क्रिस वोक्स देखील दुखापतग्रस्त आहे. तसेच मालिकेपूर्वी मानसिक प्रकृतीचे कारण देत बेन स्टोक्सने आपले नाव मागे घेतले होते.
महत्वाच्या बातम्या –
–आनंद गगनात मावेना! अप्रतिम चेंडू टाकत विराटची विकेट घेताच सॅम करनचे जोरदार सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल
–पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलचा मार्क वूडने ‘असा’ काढला काटा, पाहा व्हिडिओ
–अर्धशतक झळकावले नसताना देखील कर्णधार कोहलीने केली २१ वर्षांपूर्वीच्या अझरुद्दीनच्या विक्रमाची बरोबरी