---Advertisement---

आनंद गगनात मावेना! अप्रतिम चेंडू टाकत विराटची विकेट घेताच सॅम करनचे जोरदार सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, ऑगस्ट 16, 2021 12:29 AM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे.या सामन्यातील पहिले दोन दिवस भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला होता. तर सामन्यातील तिसऱ्या(१४ ऑगस्ट) आणि चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) इंग्लंड संघातील गोलंदाजांनी भारतीय संघाला सुरुवातीला बॅकफूटवर टाकले होते. केएल राहुल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीही लवकर माघारी परतला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु. ऑली रॉबिन्सनने त्याला ४२ धावांवर माघारी धाडले होते. तसेच दुसऱ्या डावात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर विराट कोहलीवर संघाला मोठी धावसंख्या करून देण्याची जबाबदारी होती. परंतु, पुन्हा एकदा तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला केएल राहुल आणि रोहित शर्मा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु, लंच ब्रेकला काही मिनिटे शिल्लक असताना जो रूटने सॅम करनला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. २४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सॅम करनने भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. त्याने अप्रतिम चेंडू टाकला जो विराट कोहलीच्या बॅटचा कड घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. त्यामुळे विराट ३१ चेंडुंमध्ये २० धावा करत माघारी परतला.

विराटची विकेट घेतल्यानंतर सॅम करनने जोरदार सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.(Sam Curran sent back king Kohli to the pavelian,watch video)

 

भारताकडे १५४ धावांची आघाडी
भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले आहे. जो रुटच्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने ३९१ धावा केल्या होत्या. यासह २७ धावांची आघाडी देखील घेतली होती.

दुसऱ्या डावात भारतीय संघाने पहिल्या ३ विकेट्स लवकर गमावल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने १०० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पण चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोघेही बाद झाले. पुजारा ४५ धावा करुन, तर रहाणे ६१ धावा करुन बाद झाला. दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.

आता अखेरच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य असल्याने सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्धशतक झळकावले नसताना देखील कर्णधार कोहलीने केली २१ वर्षांपूर्वीच्या अझरुद्दीनच्या विक्रमाची बरोबरी

आरारा..खतरनाक!! रूटने मारलेला अप्रतिम शॉट पाहून सिराजसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना ‘या’ कारणामुळे करण्यात आले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---