इंग्लंडचा ३५ वर्षीय क्रिकेटपटू आणि वनडे व टी२० संघांचा कर्णधार ओएन मॉर्गन याने मंगळवारी (२८ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कारणास्तव मॉर्गनने हा मोठा निर्णय घेतला आहे. मॉर्गन इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार राहिला असून त्याने इंग्लंडला २०१९ मध्ये पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकवून दिला होता.
“मी जे काही साध्य केले आहे, त्याचा मला अभिमान आहे. पण माझ्या ओळखीच्या काही महान लोकांसोबत असलेल्या आठवणी मी आयुष्यभर जपेन,” असे वक्तव्य निवृत्तीनंतर मॉर्गनने केले आहे.
मॉर्गनला २०१५ एकदिवसीय विश्वचषकानंतर इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले होते. त्यावर्षी खेळल्या गेलेल्या विश्वचषकात इंग्लंड संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. बांगलादेशसारख्या संघाकडून इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला होता. परंतु मॉर्गन कर्णधार बनल्यानंतर संघात नवीन ऊर्जा संचारल्याचे पाहिले गेले होते. मॉर्गनने संघात असे गोलंदाज घेतले, जे फलंदाजीही चांगल्या प्रकारे करू शकत असतील.
त्याच्या नेतृत्वात इंग्लंडचा वनडे संघ निर्भीडपणे खेळू लागला आणि वनडे क्रिकेटमध्ये अनेकदा मोठी धावसंख्या बनवली. संघात फलंदाजांची भरमार असल्यामुळे इंग्लंडला हे शक्य झाले. २०१९ साली मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने पहिला वनडे विश्वचषकही जिंकला होता. त्याने वनडे क्रिकेटमध्ये १२६ सामन्यात इंग्लंडच्या संघाचे नेतृत्त्व करताना ७६ सामने जिंकले आहेत. त्याची वनडे क्रिकेटमधील विजयी सरासरी ६५.२५ इतकी राहिली आहे. तसेच तो आयर्लंड आणि इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडूही आहे.
🚨 BREAKING: England skipper Eoin Morgan has announced his retirement from international cricket.
Details 👇 https://t.co/aLTQ3H2gZm
— ICC (@ICC) June 28, 2022
याखेरीज मॉर्गनची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्येही गणना होते. त्याने इंग्लंडकडून ११५ टी२० सामने खेळताना २४५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १४ अर्धशतके निघाली आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्याचे आकडे प्रशंसनीय आहेत. त्याने ७२ टी२० सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना ४२ विजय मिळवले आहेत.
असे असले तरीही, मॉर्गननंतर इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्त्व कोण करेल?, याबद्दल कसलीही अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. मात्र जोस बटलर या पदासाठी प्रबळ दावेदार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी
किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल
ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न