जाॅस बटलरच्या कामगिरीच्या जीवावर इंग्लंड 2019 सालचा विश्वचषक जिंकू शकतो असे वक्तव्य इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे.
मायकेल वॉन म्हणाला,” ज्या संघाकडे एक्स फॅक्टर खेळाडू असतात तेच संघ मोठ्या स्पर्धा जिंकतात. आज जॉस बटलरच्या रूपाने इंग्लंडकडे एक्स फॅक्टर खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा इंग्लंड संघाचे नाव निघते तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा बटलर येतो.”
गेल्या तीन महिन्यांपासून जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडात जॉस बटलर हे नाव आहे.
आयपीएल गाजवल्यानंतर पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका आणि आता नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत बटलरने आपल्या कामगिरीने जगभरातील दिग्गजांकडून वाहवा मिळवली आहे.
इंग्लंडने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिला.
या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बटलरने अटातटीच्या सामन्यात शतक करत इंग्लंडला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. जॉस बटलर सध्या त्याच्या कारकिर्दिच्या सुवर्ण काळात आहे.
इंग्लंडने गेल्या 11 एकदिवसीय मालिकेतील 10 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
नुकतेच इंग्लंडने 140 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला प्रथमच व्हाइट वॉश दिला आहे.
सध्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत इंग्लंड संघ अव्वल स्थानी आहे. तसेच 2019 विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असल्यामुळे इंग्लंडला घरच्या परिस्थितीचा नक्कीच फायदा होणार आहे.
या सगळ्यांबरोबर जॉस बटलर आणि इंग्लंडचा फॉर्म कायम राहिला तर मायकेल वॉनची भविष्यवाणी खरी ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
-Breaking- पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवृत्तीची घोषणा
-या खास कारणामुळे केदार जाधवने मानले पत्नीचे आभार