ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडला १८३ धावांवर बाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. दरम्यान चेतेश्वर पुजारा जेव्हा पायचीत झाला होता, तेव्हा इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये मजेशीर कृत्य घडले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाला रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. तो अवघ्या ३६ धावा बाद करत माघारी परतला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला.(England coach Chris silverwood different emotions during match)
तर झाले असे की, ऑली रॉबिन्सनने टाकलेला एक चेंडू टप्पा पडून आतल्या दिशेने आला, जो पुजाराला कळालच नाही. तो चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला. त्यामुळे २ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला बाद घोषित करण्यात आले होते. इकडे मैदानावर पंचांनी हात उचलताच ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांना प्रचंड आनंद झाला होता. ते तिथे बसून हसत असल्याचे दिसून आले होते.
https://twitter.com/PrabS619/status/1423268167342821379?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1423268167342821379%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Findia-vs-england-england-coach-chris-silverwood-different-emotion-during-match-80930
परंतु पुजाराने लगेच डीआरएसची मागणी केली आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसून आले की, चेंडू यष्टीच्या वरून गेला आहे. हे पाहून पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि पुजाराला नाबाद घोषित करण्यात आले. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्यांनी आपल्या पुढे बसलेल्या सहकाऱ्याच्या खुर्चीवर डोके ठेवून निराशा व्यक्त केली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु जीवनदान भेटून सुद्धा चेतेश्वर पुजारा मोठी खेळी करू शकला नाही. तो जेम्स अँडरसनच्या चेंडूवर ४ धावांवर जोस बटलरच्या हातून झेलबाद झाला. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाच्या धावा ४ बाद १२५ आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला होता. सलामीवीर केएल राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत मैदानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पूर्ण जगापुढे ‘या’ माजी क्रिकेटरची पोलखोल, वयाच्या ५१ व्या वर्षीही बनवायच्या आहेत नवनव्या गर्लफ्रेंड
इंग्लंड संघाला जबर धक्का! ‘हा’ गोलंदाज टी२० विश्वचषकासह ऍशेसमधून बाहेर
जिमीने गाठला जम्बो! विराटला बाद करताच अँडरसनने केली कुंबळेशी बरोबरी