सध्या विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा सुरू आहे. मात्र, स्पर्धेदरम्यानच इंग्लंड क्रिकेट संघाने आपल्या नवीन केंद्रिय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी खेळाडूंना तीन वेगवेगळ्या श्रेणीतील केंद्रीय करार दिला आहे. यामध्ये एकूण 29 खेळाडूंचा समावेश आहे. ईसीबीने पहिल्यांदाच 3 खेळाडूंना पुढील तीन वर्षांचा केंद्रीय करार दिला आहे. यामध्ये जो रूट, हॅरी ब्रूक आणि मार्क वूड यांच्या नावाचा समावेश आहे. यापूर्वी बोर्ड फक्त एक वर्षांचाच केंद्रीय करार करत होतं. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदा हे पाऊल उचलले आहे. हा नवीन केंद्रीय करार 1 ऑक्टोबर 2023पासून लागू झाला आहे.
बेन स्टोक्सला फक्त एक वर्षाचा करार
नवीन केंद्रीय करारात जिथे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तीन महत्त्वाच्या खेळाडूंना 3 वर्षांचा करार दिला आहे, तर 18 खेळाडूंना त्यांनी 2 वर्षांच्या केंद्रीय करारात सामील केले आहे. यामध्ये जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांच्यासह संघातील अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे, तिसरी श्रेणी एक वर्षांच्या करारासाठीी असून त्यात कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये मोईन अली आणि जेम्स अँडरसन यांचाही समावेश आहे.
खरं तर, बेन स्टोक्स याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, वनडे क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी त्याने आपली निवृत्ती माघारी घेतली. तसेच, तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मागील एका वर्षात मैदानावर शानदार प्रदर्शन केले आहे.
🗞️ We've announced our England Men's Central Contract offers for 2023-24…
And seven players have received offers for the first time!
Find out more 👇
— England Cricket (@englandcricket) October 24, 2023
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी
तीन वर्षांचा केंद्रीय करार- जो रूट, हॅरी ब्रूक आणि मार्क वूड
दोन वर्षांचा केंद्रीय करार- जोस बटलर, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ओली पोप, गस एटकिन्सन, रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो, ब्रायडन कार्स, ख्रिस वोक्स, झॅक क्राऊले, बेन डकेट, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, जोश टंग
एक वर्षाचा केंद्रीय करार- बेन स्टोक्स, मोईन अली, जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, रीस टोप्ले, बेन फोक्स, जॅक लीच आणि डेविड मलान.
विकास करार (Development Contract)- साकिब महमूद, मॅथ्यू फिशर आणि जॉन टर्नर (england cricket team central contract list ecb gives all rounder ben stokes only one year contract 2023 read here)
हेही वाचा-
मोठी बातमी! पंड्याच्या दुखापतीवर आली सर्वात मोठी अपडेट, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला…
ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वी नेदरलँड्सच्या खेळाडूचे विधान; म्हणाला, ‘आम्ही इथे सेमीफायनल…’