---Advertisement---

भारत दौऱ्याविषयी अँडरसनची सर्वात मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी खूप चांगले…’

James Anderson
---Advertisement---

नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन संघासाठी काही खास करू शकला नाही. 41 वर्षीय वेगवान गोलंदाज अँडरसनने 4 कसोटीत केवळ 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने शेवटचा सामना जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. मात्र, ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका राखली. तेव्हापासून अँडरसनच्या निवृत्तीची बरीच चर्चा झाली होती. आता अँडरसनने भारत दौऱ्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जेम्स अँडरसन (James Anderson) याला वाटते की, तो भारत दौऱ्यावर येऊन क्रिकेट विश्वात जोरदार पुनरागमन करू शकतो. तो इंग्लंड संघाला भारताच्या दौऱ्यावर चांगले योगदान देऊ शकतो. त्याची भारतात कामगिरीही चांगली आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध 13 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट्स घेतले आहेत.

अँडरसनने व्यक्त केली भारतात खेळण्याची इच्छा
अँडरसनने टेलिग्राफमधील आपल्या स्तंभात लिहिले आहे की, “मला काही महिने विश्रांती घ्यायची आहे. यादरम्यान मी तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करेल. या काळात मी गोलंदाजी करणार नाही. पुनरागमन करण्यासाठी विश्रांती घेणे किती महत्त्वाचे आहे, हे मला माहीत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या संभाषणात मी म्हणालो होतो की, मला संघासाठी चांगले योगदान द्यायचे होते. मात्र, तसे झाले नाही. पण मला वाटते की, 2024 च्या भारत दौऱ्यावर जर मी गेलो, तर संघासाठी खूप चांगले योगदान देऊ शकतो.”

मात्र, अँडरसनला भारत दौऱ्यावर घ्यायचे की, नाही याचा अंतिम निर्णय इंग्लंड संघाच्या निवड समितीकडे असणार आहे. आपली क्षमता दाखवण्यासाठी उत्सुक असलेला अँडरसन ऑक्टोबरमध्ये गोलंदाजीच्या तयारीसाठी परतेल. त्याने ठरवले आहे की, तो सप्टेंबरमध्ये होणाऱ्या काऊंटी सामन्यांवर लक्ष देणार नाही. तो फक्त आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करणार आहे. 2024च्या भारत दौऱ्यावर अँडरसनला संधी मिळेल आणि तो गोलंदाजीमध्ये त्याची चमक दाखवेल, अशी आशा अँडरसनच्या चाहत्यांना आहे. (england fast bowler james anderson aims tour india 2024)

महत्वाच्या बातम्या:
क्रिकेटप्रेमीने आवर्जुन वाचावा असा किस्सा: इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद
पहिल्या टी20तील घोडचूकीसाठी आयसीसीने भारत अन् वेस्ट इंडिजवर ठोठावला दंड, यजमानांचे मोठे नुकसान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---