इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी(१८ नोव्हेंबर) २०२१ वर्षाचे मायदेशातील क्रिकेट सामन्यांचे तात्पुरते वेळापत्रक घोषित केले आहे. त्यानुसार इंग्लंडचा पुरुष संघ भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका पुढीलवर्षी ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
या कसोटी मालिकेतील पाचही सामने पाच वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगघम येथे सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान होईल. तर तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्टदरम्यान हेडिंग्ले येथे होईल.
शेवटचे दोन कसोटी सामने सप्टेंबरमध्ये होतील. चौथा सामना २ ते ६ सप्टेंबरदरम्यान किया ओव्हल स्टेडियमवर तर १० ते १४ सप्टेंबरदरम्यान पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होईल.
पाकिस्तान, श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने –
याबरोबर इंग्लंड संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकाही पुढीलवर्षी खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची तर पाकिस्तान विरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका होईल. या मालिका जून-जूलै दरम्यान होणार आहेत.
त्याचबरोबर महिला इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका होतील. नंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका होईल.
तसेच दृष्टीहीन इंग्लंड संघ ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळण्याचीही शक्यता असल्याचे इंग्लंडने जाहीर केले आहे.
तारखा बदलण्याचीही शक्यता –
या सर्व मालिका बंद दरवाज्यामागे म्हणजे प्रेक्षकांविना होणार आहेत. तसेच सध्या श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेबरोबरच टी२० आणि कसोटी मालिका घेण्याबद्दलही चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची तारिख बदलण्याबाबतही चर्चा सुरु असल्याचे इंग्लंड बोर्डाने सांगितले.
याबरोबरच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने असेही सांगितले आहे की कोरोना व्हायरसमुळे किंवा इतर काही कारणास्तव संभाव्य तारखांमध्ये आणि ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतात.
असे आहे इंग्लंड पुरुष संघाचे मायदेशातील २०२१ वर्षाचे तात्पुरते वेळापत्रक –
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका –
वनडे मालिका
२९ जून – पहिला वनडे सामना, एमिरेट्स रिव्हरसाईड डर्हम
१ जुलै – दुसरा वनडे सामना, किया ओव्हल
४ जुलै – तिसरा वनडे सामना – ब्रिस्टल काऊंटी ग्राऊंड
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान –
वनडे मालिका –
८ जुलै – पहिला वनडे सामना – सोफिया गार्डन, कार्डिफ
१० जुलै – दुसरा वनडे सामना – लॉर्ड्स, लंडन
१३ जुलै – तिसरा वनडे सामना – एजबस्टन
टी२० मालिका –
१६ जुलै – पहिला टी२० सामना – ट्रेंट ब्रिज
१८ जुलै – दुसरा टी२० सामना – हेडिंग्ले
२० जुलै – तिसरा टी२० सामना – ओल्ड ट्रॅफर्ड
इंग्लंड विरुद्ध भारत –
कसोटी मालिका
४-८ ऑगस्ट – पहिली कसोटी – ट्रेंट ब्रिज
१२-१६ ऑगस्ट – दुसरी कसोटी, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरी कसोटी, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथी कसोटी, किया ओव्हल
१०-१४ सप्टेंबर – पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या दिवशी सचिन मैदानावर रडला, त्याच दिवशी सचिनला लाराने भेट दिली होती खास वस्तू
२०११ विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटर खेळणार लंका प्रीमियर लीगमध्ये
ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच देशात नडत ‘या’ भारतीयाने केली होती अफलातून कामगिरी






