उद्यापासून (11 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया (England Vs Australia) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टी20 सामन्याआधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघात 3 नवे चेहरे पदार्पण करताना दिसणार आहेत. पण इंग्लंडची ही प्लेइंग इलेव्हन आश्चर्यचकित करण्याजोगीच आहे.
इंग्लंड संघाने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमधील सर्वात खास नाव आहे, अंडर-19 संघातील खेळाडू जेकब बेथेल. बेथेल आता इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासाठी पदार्पण करताना दिसणार आहे. जेकब बेथेल (Jacob Bethell) व्यतिरिक्त जेमी ओव्हरटन आणि जॉर्डन कॉक्स यांनाही इंग्लडने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आहे. या तिन्ही खेळाडूंना त्यांचे पदार्पण संस्मरणीय बनवून कांगारू संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा असेल.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी20 मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट आणि विल जॅक्स संघाची सलामी करताना दिसणार आहेत. जॅक्स आणि सॉल्ट हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड संघ- फिल सॉल्ट, विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपली.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील 3 टी20 सामन्यांचे वेळापत्रक- पहिला टी20 सामना (11 सप्टेंबर), दुसरा टी20 सामना (13 सप्टेंबर), तिसरा टी20 सामना (15 सप्टेंबर)
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनकडे नंबर 1 गोलंदाज बनण्याची संधी, घ्याव्या लागतील फक्त ‘इतक्या’ विकेट्स
“कोहली ऑस्ट्रेलियन आहे” दिग्गज खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा