सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गतविजेता इंग्लंड काहीसा माघारलेला दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यांना स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावे लागतील. अशात आता इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी एक मोठे विधान केले आहे.
इंग्लंड या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार म्हणून सहभागी झाला होता. जोस बटलर याच्या नेतृत्वातील या संघाला मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने त्यांना नऊ गडी राखून पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशविरुद्ध सोपा विजय मिळवला. परंतु तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने त्यांना हरवत उलटफेर केला. सोबतच चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 229 धावांनी त्यांना धूळ चारली.
या खराब कामगिरीनंतर इंग्लंड संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबद्दल बोलताना इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक मॅट पॉट्स म्हणाले,
“आमची कामगिरी अपेक्षित अशी झाली नाही, हे आम्हाला माहीत आहे. मात्र, अजूनही आम्हाला पुन्हा रागमन करण्याची संधी आहे. आम्ही अजूनही या विश्वचषकात विजेते होऊ शकतो.”
इंग्लंड संघाला अद्यापही या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेदरलँड्स व पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नसेल.
विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड विली, आदिल रशीद, गस एटकिन्सन, मार्क वूड, ब्रायडन कार्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन.
(England Head Coach Hoping We Will Win World Cup 2023)
हेही वाचा-
गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…