भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात स्पर्धेचा 21वा सामना धरमशाला येथे रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. तसेच, विजयाचे पंचक पूर्ण केले. दुसरीकडे, हा न्यूझीलंडचा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. आता न्यूझीलंडला पुढील सामनाही धरमशालेतच खेळायचा आहे. त्यामुळे खेळाडू मोकळ्या वेळेत धरमशालेतील निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद लुटताना दिसत आहेत. अशातच मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) न्यूझीलंडच्या खेळाडूंनी धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली.
न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket Team) संघाचे खेळाडू मुख्य बौद्ध मंदिरात पोहोचले होते. त्यांनी यादरम्यान कुटुंबासोबत दलाई लामा (New Zealand team met Dalai Lama) यांची भेट घेतली. तसेच, त्यांनी दलाई लामा (Dalai Lama) यांचा आशीर्वादही घेतला. खेळाडूंनी यावेळी त्यांच्याशी संवादही साधला. त्यामध्ये केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट, टॉम लॅथम, लॉकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. न्यूझीलंड संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या भेटीचे फोटो शेअर केले गेले आहेतक. आता हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/Cyxvk9ss84i/?img_index=1
न्यूझीलंड संघाचा पुढील सामना
न्यूझीलंड संघाच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर त्यांना 28 ऑक्टोबर रोजी 5 वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना धरमशाला येथेच खेळला जाणार आहे. नियमित कर्णधार केन विलियम्सन दुखापतग्रस्त असूनही न्यूझीलंड संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील आपल्या प्रदर्शनाने प्रत्येकाचे मन जिंकले आहे. संघाने 5 पैकी 4 सामने जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह भारतानंतर दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत न्यूझीलंडला इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. मात्र, त्यांना भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंड संघाचे हे प्रदर्शन अशा वेळेत आलं आहे, जेव्हा त्यांचा नियमित कर्णधार आणि प्रमुख फलंदाज केन विलियम्सन फक्त एक सामना खेळू शकला आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियानंतर 1 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका, 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. (Dharmshala new zealand cricket team met religious leader dalai lama in mcleodganj see photos)
हेही वाचा-
गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…